SRH Vs DC, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 47व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (Sunrisers Hyderabad Vs Delhi Capitals) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्टीय मैदानात हा सामना खेळला जाणार आहे.
SRH Vs DC, 46th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 47व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (Sunrisers Hyderabad Vs Delhi Capitals) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्टीय मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाचे नेतृत्व डेव्हिड वार्नर (David Warner) करत आहेत. तर,दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे कर्णधार पद श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, आज 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.
या हंगामात हैदराबाद आणि दिल्ली या दोन्ही संघाने प्रत्येकी 11 सामने खेळले आहेत. यापैकी हैदराबादच्या संघाने 4 तर, दिल्लीच्या संघाने 7 सामने जिंकून आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या तिन्ही संघानी प्ले-ऑफची जागा जवळपास निश्चित केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ स्पर्धेबाहेर गेला असून कोलकाता, पंजाब आणि हैदराबाद यांच्यात चौथ्या स्थानासाठी शर्यत लागली आहे. हे देखील वाचा- IPL 2020 Top-5 Best Catches: आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी घेतले भन्नाट कॅच; 13व्या हंगामात जोफ्रा आर्चर, फाफ डु प्लेसिसचा सुपर कॅच पाहातच राहाल
सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बेसिल थंपी, यरा पृथ्वीराज, बिली स्टॅनलेक, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल , खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृध्दिमान साहा, अब्दुल समद, फॅबियन अलन, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, संदीप बावनका, संजय यादव, विराट सिंग.
दिल्लीची राजधानी: अजिंक्य रहाणे, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमीयर, मार्कस स्टोइनिस, अॅक्सर पटेल, रविचंद्रन अश्विन, कॅगिसो रबाडा, अनरिच नॉर्टजे, तुषार देशपांडे, पृथ्वी शॉ, डॅनियल पटेल, हर्षल पटेल , मोहित शर्मा, अॅलेक्स कॅरी, अवेश खान, प्रवीण दुबे, संदीप लामिछाने, कीमो पॉल, ललित यादव.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)