Faf du Plessis, दक्षिण आफ्रिका च्या फलंदाजाने Test cricket मधून निवृत्तीची इंस्टाग्राम पोस्ट द्वारा केली घोषणा

त्याच्या नावावर 4163 धावांची नोंद आहे. त्यामध्ये 10 शतकी खेळींचा समावेश आहे.

Faf du Plessis | Photo credits: Instagram /Faf du Plessis

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार Faf du Plessis याने आज टेस्ट क्रिकेट अर्थात कसोटी मधून तातडीची निवृत्ती जाहीर केली आहे. Faf du Plessis याने साऊथ आफ्रिकेसाठी आतापर्यंत 69 टेस्ट मॅच खेळले आहेत. त्याच्या नावावर 4163 धावांची नोंद आहे. त्यामध्ये 10 शतकी खेळींचा समावेश आहे. 36 वर्षीय Faf du Plessis ने त्याच्या निवृतीची घोषणा इंस्टाग्राम वर केली आहे.

इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा करताना, 'माझ्या देशासाठी खेळण्याचा मला बहुमान मिळाला याचा मला आनंद आहे पण आता टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे.' असं तो म्हणाला आहे. (हे देखील नक्की वाचा: Fastest Centuries by Indian in Test: टेस्ट क्रिकेटमध्ये 'या'6 भारतीय फलंदाजांनी ठोकले वेगवान शतके, 'हा' माजी कर्णधार आहे No 1).

Du Plessis ची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Faf du plessis (@fafdup)

Du Plessis ने टेस्ट क्रिकेट मध्ये 2012 साली ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यामधून पदार्पण केले होते. अ‍ॅडलेटच्या खेळपट्टीवर त्याने शतक ठोकत चौथ्या इनिंगमध्ये मॅच जिंकवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. दक्षिण आफ्रिकेच्या 11 खेळाडूंच्या यादीमध्ये मधल्या फळीतील तो एक दमदार खेळाडू होता. अशामध्ये त्याच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी आली. AB de Villiers कडून त्याच्याकडून कर्णधार पद दिल्यानंतर त्याने 36 टेस्ट मॅच मध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्यापैकी 18 सामने दक्षिण अफ्रिका जिंकली तर 15 सामने पराभूत झाली. Graeme Smith आणि Hansie Cronje नंतर du Plessis हा दक्षिण आफ्रिका संघाला टेस्ट मॅच मध्ये सर्वाधिक वेळा नेतृत्त्व करणारा खेळाडू ठरला आहे.

दरम्यान टेस्ट मॅच पासून दूर जात असला तरीही Du Plessis हा इतर लिमिटेट ओव्हर्स क्रिकेट फॉर्मेट मध्ये खेळणार आहे. पुढील 2 वर्षात ICC T20 World Cup आहे. या क्रिकेटच्या फॉर्मेटवर आपलं लक्ष केंद्रीत करायचं आहे असे त्याने म्हटलं आहे. 'जगभरात मला जितकं शक्य आहे तितकं क्रिकेट खेळायचं आहे.'अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.



संबंधित बातम्या