South Africa Women vs New Zealand Women, Final Pitch And Weather Report: दुबईच्या मैदानावर फलंदाज की गोलंदाजांचे असेल वर्चस्व? जाणून घ्या अंतिम सामन्यापूर्वी खेळपट्टी आणि हवामान अहवाल

सध्य दक्षिण आफ्रिका जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. संपूर्ण विश्वचषकात संघाने केवळ एकादा पराभव पत्कारला आहे. कर्णधार लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत उपांत्य फेरीत शानदार विजयाची नोंद केली आहे.

South Africa Women vs New Zealand Women, Final Pitch And Weather Report: दुबईच्या मैदानावर फलंदाज की गोलंदाजांचे असेल वर्चस्व? जाणून घ्या अंतिम सामन्यापूर्वी खेळपट्टी आणि हवामान अहवाल
Photo Credit- X

South Africa Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team, 2024 ICC Womens T20 World Cup Final: 2024च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 साठीची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना आज 20 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट संघात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेची कमान लॉरा वोल्वार्डच्या खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे.

यंदाच्या फायनलची खास गोष्ट म्हणजे या दोन्ही संघांनी अद्याप विश्वचषकाची ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा स्थितीत कोणत्याही संघाने हे विजेतेपद मिळवले तरी इतिहास बदलणार हे नक्की. सध्याच्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा पराभव केला.(IND vs NZ 1st Test Day 5 Live Streaming: थोड्याच वेळात पाचव्या दिवसाच्या खेळाला होणार सुरुवात, न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांची गरज; तर भारताला करावा लागणार चमत्कार)

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका केवळ एका पराभवाने जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कर्णधार लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत उपांत्य फेरीत शानदार विजयाची नोंद केली. अनेके बॉश आणि मारिझान कॅप हे दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख फलंदाज आहेत, तर गोलंदाजीमध्ये अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा यांनी महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंडने या स्पर्धेत प्रत्येक आव्हानाचा बेधकडपणे सामना केला आहे. न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्धचा चुरशीचा सामना जिंकला होता. मात्र, न्यूझीलंड संघाची फलंदाजी आतापर्यंत फारशी छाप पाडलेली नाही. अंतिम सामन्यात कर्णधार सोफी डिव्हाईन, अमेलिया केर आणि सुझी बेट्स यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. न्यूझीलंडची गोलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. न्यूझीलंडसाठी एडन कार्सन आणि रोझमेरी मार यांनी महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आहेत.

हेड टू हेड रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात दक्षिण आफ्रिकेने चार सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 11 सामने जिंकले आहेत. तर एकाही सामन्याचा निकाल लागला नाही. आकडेवारी पाहता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंड संघाचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट होते.

खेळपट्टी अहवाल

आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना दुबईत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांना खूप मदत मिळते. येथील वेगवान आऊटफिल्डही फलंदाजांना मदत करतात. पण या खेळपट्टीवरून फिरकीपटूंनाही मदत मिळू शकते. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 140-150 धावा झाल्या आहेत. जर एखाद्या संघाने अंतिम सामन्यात 160 किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर त्याला फायदा मिळू शकतो. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. गेल्या पाच टी-20 सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने चार वेळा विजय मिळवला आहे. या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात फलंदाजी करणे थोडे सोपे होऊ शकते.

हवामान अहवाल

रविवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये हवामान स्वच्छ असेल. या कालावधीत तापमान 30-35 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकते. खेळादरम्यान पावसाची शक्यता नाही, त्यामुळे खेळ कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहील.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, मारिझान कॅप, क्लो ट्रायन, सून लुस, नादिन डी क्लर्क, अनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.

न्यूझीलंड: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, एडन कार्सन, फ्रॅन जोनास.

(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2024 08:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).