South Africa vs Netherlands Live Score, World Cup 2023: धर्मशाळेत पावसाचा खेळ थांबला, साऊथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकण्यापूर्वी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ICC ODI विश्वचषक 2023 च्या 15 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स आमनेसामने आहेत. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने 2023 च्या विश्वचषकाची शानदार सुरुवात केली आहे. या संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. तर नेदरलँड्सला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने नाणेफेकीला उशीर झाला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकण्यापूर्वी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे, पण या विश्वचषकात आणखी एक मोठा अपसेट पाहायला मिळेल का?
दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हन
नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ'डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकीपर), सिब्रांड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन .
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जेन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.
पाहा पोस्ट -