AB de Villiers निवृत्तीतून घेणार यु-टर्न, दक्षिण आफ्रिकेसाठी ‘या’ मालिकेतून कमबॅक करण्याचे CSA संचालक ग्रीम स्मिथने दिला इशारा

कॅरिबियन क्रिकेट पॉडकास्टनेही ही माहिती शेअर केली आहे. डीव्हिलियर्सने मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कप खेळण्याचा आपला हेतू जाहीर केला होता.

एबी डीव्हिलियर्स (Photo Credit: Getty Images)

AB de Villiers Return: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला भुरळ पाडली आहे. डिव्हिलियर्स राष्ट्रीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला जरी तो असूनही सध्या टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. माजी आफ्रिकी कर्णधार निवृत्तीमधून बाहेर येण्यास इच्छुक असल्याचे सर्वांचं ठाऊक आहे पण आता तो क्षण जवळ आल्याचं दिसत आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात टी-20 मालिका लवकरच खेळलीय जाणार आहे. 2018 मध्ये निवृत्ती जाहीर करत डिव्हिलियर्सने 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर ब्रेक लावला परंतु मागील वर्षापासून फलंदाज निवृत्तीतून यू-टर्न घेण्याबद्दल चर्चा सुरु झाली. डीव्हिलियर्सने मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळण्याचा आपला हेतू जाहीर केला होता पण कोविड-19 महामारीमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. (AB de Villiers: ए बी डिव्हिलियर्सच्या आयपीएलमधील 5 हजार धावा पूर्ण, अशी कामगिरी करणारा परदेशातील ठरला दुसरा खेळाडू)

यंदाचा टी-20 वर्ल्ड कप वेळापत्रकानुसार होण्याची अपेक्षा असल्याने डिव्हिलियर्सच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्याकडे चाहत्यांचे लक्ष लागून असेल. रिपोर्ट्सनुसार क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक ग्रीम स्मिथने डिव्हिलियर्स तसेच क्रिस मॉरिस आणि इमरान ताहिरच्या वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेसाठीच्या संघात परतण्याचे संकेत दिले. कॅरिबियन क्रिकेट पॉडकास्टनेही ही माहिती शेअर केली आहे. दक्षिण आफ्रिका 2 जून रोजी कॅरिबियन दौर्‍यावर जाणार असल्याचं समजलं जात असून दोन्ही संघादरम्यान 5 सामन्यांची टी-20 मालिका आयोजित केली जाणार आहे. दरम्यान, आयपीएलची 14 वी आवृत्ती स्थगित होण्यापूर्वी डिव्हिलियर्सने आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी शानदार कामगिरी बजावली होती. आरसीबीसाठी चौथ्या व पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करूनही डीव्हिलियर्स संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 6 डावांमध्ये 51.75 च्या सरासरीने एकूण 207 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक-रेट (164.28) अत्यंत प्रभावी होता.

दरम्यान, आयपीएल 2021 दरम्यान आपल्या आंतरराष्ट्रीय कमबॅकवर डिव्हिलियर्सला विचारल्यावर फलंदाजाने म्हटले की, “दक्षिण आफ्रिकेसाठी पुन्हा खेळणे चांगले ठरेल, मी आयपीएलच्या शेवटी बाउचरशी बोलणार आहे - गेल्या वर्षी मला विचारले की मला रस आहे का आणि मी म्हणालो- ‘पूर्णपणे’.”