सौरव गांगुलीला आली भारत-ऑस्ट्रेलिया 2001 ऐतिहासिक टेस्ट विजयाची आठवण, अशा प्रकारे साजरा केला होता विजय, पाहा Video
ट्विटर यूजरने 2001 च्या कसोटी विजयानंतर उत्सवाचे क्षण शेअर केले होते.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी बुधवारी 2001 मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन (Eden Gardens) येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) ऐतिहासिक कसोटी विजयाची आठवण केली. ट्विटर यूजरने 2001 च्या कसोटी विजयानंतर उत्सवाचे क्षण शेअर केले होते. गांगुलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इडन गार्डन्स येथे झालेल्या कसोटी सामन्यात थरारक विजयी मिळवला आणि आजही चाहते त्या रोमांचक क्षणाची आठवण काढतात. राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्हीव्हीस लक्ष्मण (VVS Laxman) यांच्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. ट्विटर यूजरने ड्रेसिंग रूममधील उत्सवाचा व्हिडिओ शेअर केलेल्या व्हिडिओने गांगुलीचे लक्ष वेधून घेतले, ज्याला पाहून 'दादा'च्याही जुन्या आठवणी उजागर झाल्या. त्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 171 धावांनी विजय मिळवला आणि फॉलोऑन दिल्यावर विजय मिळवणारा कसोटी इतिहासातील फक्त तिसरा संघ बनला.
फुटेजमध्ये भारतीय संघ ड्रेसिंग रूममध्ये उत्सव साजरा साजरा करताना आणि इडन गार्डन्स मैदानावर विजयी लॅप लागवताना दिसत आहे. त्या पोस्टवर गांगुलीने टिप्पणी केली, "काय विजय होता." पाहा हा व्हिडिओ:
स्टीव्ह वॉच्या शानदार शतकाच्या सौजन्याने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या. तथापि, भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंहने कोलकाता येथे सात विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले. या सामन्यात भज्जीने भारताच्या कसोटी इतिहासातील पहिली हॅटट्रिकही घेतली. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावात 171 धावांवर ऑलआऊट केले आणि फॉलोऑन दिला. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने सावध खेळ करत 115 धावांवर तीन विकेट गमावल्या. त्यानंतर 232 धावांवर भारताने गांगुलीची चौथी विकेट गमावली. त्यानंतर द्रविड आणि लक्ष्मणने 376 धावांची भागीदारी करत भारताला मुश्किल स्थितीतून उभारले. द्रविडने 180 धावा केल्या तर लक्ष्मणने 281 धावा फटकावल्या, ही कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 384 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 212 धावांवर ऑलआऊट केले आणि भारताने कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला.