Sourav Ganguly on Virat Kohli Captaincy: विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यावर सौरव गांगुलीने दिली 'हि' प्रतिक्रिया, घ्या जाणुन
विराटचे हे पाऊल त्याचा वैयक्तिक निर्णय असून बीसीसीआय त्याच्या निर्णयाचा पूर्ण आदर करते.
विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (IND vs SA Test Match) कसोटी मालिका 1-2 ने गमावल्यानंतर विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कोहलीने टी-20 (T-20) आणि वनडेचे कर्णधारपदही सोडले होते. कोहलीच्या आता कसोटी कर्णधारपद सोडण्यावर बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीचे (Sourav Ganguli) वक्तव्य आले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. खरं तर, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोहलीने टी-20 आणि एकदिवसीय कर्णधारपदाबाबत बीसीसीआयचा दावा फेटाळला होता आणि तेव्हापासून कर्णधारपदावरून वाद सुरू झाला होता.
आता गांगुलीने कोहलीसाठी लिहिले की, विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली. विराटचे हे पाऊल त्याचा वैयक्तिक निर्णय असून बीसीसीआय त्याच्या निर्णयाचा पूर्ण आदर करते. भविष्यात संघाला नव्या उंचीवर नेण्यासाठी तो संघाचा महत्त्वाचा सदस्य असेल. एक महान खेळाडू. खूप छान विराट. (हे ही वाचा Virat Kohli Leaves Test Captaincy: विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माने नव्हे तर 'या' दोन खेळाडूंपैकी एका खेळाडूवर BCCI टाकू शकते जबाबदारी)
Tweet
कर्णधारपदावरून होता वाद सुरु
टी-20 विश्वचषकातील भारताची मोहीम संपल्यानंतर कोहलीने या फॉरमॅटचे कर्णधारपदही सोडले होते, परंतु दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी त्याच्याकडून एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपदही घेतले गेले. ज्यावर बराच गदारोळ झाला.
बीसीसीआय अध्यक्षांनी सांगितले की, मी कोहलीला टी-20 कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते, तर पत्रकार परिषदेत कोहलीने हे नाकारले. या प्रकरणी कोणाशीही बोलणे झाले नसल्याचे कोहली म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघ निवडण्याआधी एकदिवसीय संघाचे कर्णधारपदाबद्दल त्याला सांगितले होते, असेही कोहलीने सांगितले. या प्रकरणानंतर बोर्ड आणि कोहली यांच्यात सर्व काही बरोबर नसल्याचे स्पष्ट झाले होते.