SL vs NZ: न्यूझीलंड संघाला मोठा धक्का, लोकी फर्ग्युसन श्रीलंकाविरूद्ध टी-20 मालिकेमधून बाहेर

साऊथीने सांगितले की, प्रशिक्षण दरम्यान फर्ग्युसनचा अंगठा दुखविला गेला होता.

लोकी फर्ग्युसन (Photo Credit: Getty)

विश्वचषकमध्ये शानदार प्रदर्शन करणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) याला अंगठ्याच्या दुखापतीमुळे श्रीलंका (Sri Lanka) विरूद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमधून वगळण्यात आले आहे. न्यूझीलंड क्रिकेटने अद्याप त्याचा पर्याय जाहीर केलेला नाही. रविवारी श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यातील टॉस दरम्यान कर्णधार टिम साउथी याने फर्ग्युसनच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. फर्ग्युसनने कॅंडी (Candy) येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 सामन्यात भाग घेतला नाही. त्याच वेळी स्कॅनमध्ये फर्ग्युसनच्या अंगठ्याबद्दल माहिती पडले आणि त्यामुळे त्याला संपूर्ण मालिकेतून वगळण्यात आले आहे. साऊथीने सांगितले की, प्रशिक्षण दरम्यान फर्ग्युसनचा अंगठा दुखविला गेला होता.

दुसरीकडे, किवी संघाचा कायम कर्णधार केन विल्यमसन आणि मुख्य वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट देखील श्रीलंकाविरुद्ध टी-२० मालिकेत किवी संघाचा भाग नाहीत. दरम्यान, न्यूजीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टिड यांनी फर्ग्युसनच्या दुखापतीच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि म्हणाले, "लोकीने मालिका न खेळणे लाजिरवाणे आहे, विशेषत: जेव्हा इंग्लंडमध्ये वर्ल्डकपच्या अशा प्रभावी मोहिमेनंतर खेळात होता."

श्रीलंका आणि न्यूझीलंड संघात १ सप्टेंबर रोजी पहिला टी-२० सामना खेळाला गेला. या सामन्यात किवी संघाने प्रभावी कामगिरी करत श्रीलंकेवर 5 गडी राखून विजय मिळविला. याचबरोबर न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेचा दुसरा सामना 3 सप्टेंबर रोजी पल्लेकले येथे खेळला जाणार आहे. आगामी दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेला विजय मिळवत सामना बरोबरीत आणण्याची संधी आहे, तर न्यूझीलंड मॅच जिंकून मालिका जिंकण्याच्या निर्धारित असेल. याआधी दोंघांमधील टेस्ट मालिके १-१ ने बरोबरीत संपली होती.