SL vs NZ 1st Test: पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ट्रेंट बोल्ट याने स्वतःला केले झेलबाद, जाणून घ्या कसे

श्रीलंका आणि न्यूझीलंड संघामध्ये दुसर्‍या दिवशी दहाव्या क्रमांकावरआलेल्या बोल्टने प्रीमेटेड स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण, बोल्टला कल्पना नाही की चेंडू कोठे आहे. बॉल शोधण्यासाठी, तो आजूबाजूला पाहत राहिला जेव्हा त्याच्या लक्षात आले की बॉल त्याच्या हेल्मेटच्या लोखंडी जाळीमध्ये अडकला होता.

ट्रेंट बोल्ट (Photo Credit: @ICC/Twitter)

श्रीलंका (Sri Lanka) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघामध्ये सध्या 3 सामन्यांच्याची टेस्ट मालिकेतील पहिल्या सामनाला सुरूवात आहे. या सामन्यात न्यूझीलंडची सुरूवात अतिशय खराब झाली. बिनबाद 63 या धावसंख्येवरून न्यूझीलंडची अवस्था एका वेळी 3 बाद 71 झाला होता. पण त्यानंतर अनुभवी रॉस टेलर (Ross Taylor) याने मात्र डाव सावरला. किवी क्रिकेटपटू ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने बुधवारी श्रीलंकेविरूद्ध गले येथे झालेल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी सामन्यात एक न विसरला जाणारा क्षणाचा भागीदार झाला. दुसर्‍या दिवशी पहाटे विकेट्स गमावल्यानंतर दहाव्या क्रमांकावरआलेल्या बोल्टने श्रीलंकेचा फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया (Lasith Embuldeniya) विरुद्ध प्रीमेटेड स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण, शॉट खेळण्यासाठी बॉल बरोबर बॅटवर आला नाही आणि बोल्टने तो बॉल मिस केला आणि त्याच्या हेल्मेटच्या लोखंडी जाळीवर चेंडू अडकला.

कित्येक सेकंद, बोल्टला काहीच कल्पना नव्हती की चेंडू कोठे आहे. बॉल शोधण्यासाठी, तो क्रीझच्या बाहेर पडला नाही. तो आजूबाजूला पाहत राहिला जेव्हा त्याच्या लक्षात आले की बॉल त्याच्या हेल्मेटच्या लोखंडी जाळीमध्ये अडकला होता. श्रीलंकेच्या खेळाडूंनी गमतीशीरपणे बॉल खेचून झेल बाद करण्याचा प्रयत्न केला. सर्व काही ठीक आहे याची तपासणी केल्यानंतर बाउल्टने आपला डाव पुढे सुरू केला. दोन चेंडूंनंतर त्याने एम्बुल्डेनियाच्या चेंडूवर एक षटकार मारला. पण, बोल्ट जास्त काळ आपला खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि बोल्ट 18 धावांवर मिडऑडवर झेलबाद झाला. याचबरोबर ब्लॅक कॅप्स 249 धावांवर बाद झाले.

दरम्यान, श्रीलंकेच्या पहिल्या डावात त्यांची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करायला आलेला श्रीलंकेला अर्धा संघ माघारी परतला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडची नजर यंदा आयसीसी टेस्टच्या अव्वल रँकिंगवर असणार आहे. श्रीलंकाविरुद्ध टेस्ट मालिका जिंकत किवी संघ टीम इंडियाला दुसऱ्या क्रमांकावर ढकलत टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थान मिळवेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now