
IND vs ENG 1st Test 2025: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या डावात भारताकडून 3 फलंदाजांनी शतक झळकावले. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल व्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शतक झळकावले. तथापि, शतक झळकावल्यानंतरही शुभमन गिल (Shubman Gill) आयसीसीच्या निशाण्यावर आला आहे. त्याने फलंदाजी करताना चूक केली आहे, त्यानंतर सामनाधिकारी त्याच्यावर मोठी कारवाई करू शकतात. संपूर्ण प्रकरण काय आहे, जाणून घेऊया. (हे देखील वाचा: India vs England 2025: भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळाडूंनी डेव्हिड लॉरेन्स यांना वाहिली श्रद्धांजली; हाताला काळी पट्टी बांधून खेळाडू उतरे मैदानात)
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
Shubman Gill may face disciplinary action for breaching the ICC’s clothing regulations, after wearing black socks during his innings on Day 1.
According to clause 19.45 of the ICC’s Clothing and Equipment Rules, players are only permitted to wear socks that… pic.twitter.com/V2ZgUsOURq
— Sportskeeda (@Sportskeeda) June 21, 2025
काय केले शुबमन गिलने?
खरं तर शुभमन गिलने फलंदाजी करताना काळे मोजे घातले होते. जे आयसीसीच्या ड्रेस कोड नियमाचे उल्लंघन आहे. कोणताही खेळाडू कसोटी सामन्यात काळे मोजे घालून फलंदाजी करू शकत नाही. कसोटी सामन्यासाठी आयसीसीने फक्त काही विशिष्ट रंगांचे मोजे घालण्याची परवानगी दिली आहे. आयसीसी नियम 19.45 नुसार, कसोटी सामन्यांमध्ये फक्त पांढरे, क्रीम किंवा हलके तपकिरी मोजे घालण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत आता गिलने चूक केली आहे, ज्यामुळे त्याला दंड होऊ शकतो. मॅच रेफरी रिची रिचर्डसन त्याला त्याच्या मॅच फीच्या 10 ते 20 टक्के दंड करू शकतात. जर गिलने ही चूक अजाणतेपणे केली असेल. किंवा त्याने त्याचे मोजे ओले असल्याने बदलले असतील तर कारवाई टाळता येईल.
'या' खेळाडूंवर करण्यात आली आहे कारवाई
2016 मध्ये ख्रिस गेलने काळी बॅट वापरली होती आणि त्याला दंड करण्यात आला होता. 2018 मध्ये केएल राहुलला चुकीचे हेल्मेट घातल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. याशिवाय, इमाम उल हक 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात चुकीचा लोगो घालून मैदानावर आला होता. त्यानंतर त्याला शिक्षा झाली.