Shreyas Iyer: 'अभ्यास करून या...', दुखापतीमुळे रणजी सामना न खेळण्याच्या चर्चांवर भडकला श्रेयस अय्यर, काय आहे संपूर्ण प्रकरण ?

श्रेयस अय्यर सध्या रणजी ट्रॉफीचे सामने खेळत आहे. यादरम्यान त्याच्या दुखापतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यावर श्रेयसने पोस्ट शेअर करत खोटी बातमी परवणाऱ्यांवर चांगली आग ओखली आहे.

Photo Credit- X

Shreyas Iyer Reaction Fake News About Him Miss Next Ranji Trophy Match: सध्या रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. यामध्ये मुंबई संघाने महाराष्ट्राचा पराभव करत पहिला रणजी सामना जिंकला. ज्यात श्रेयस अय्यरने दणदणीत शतक झळकावले. पण आता श्रेयस अय्यरच्या बाबतीत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. दुखापतीमुळे पुढील सामन्याला मुकणार असल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगत आहे. त्यावर श्रेयस अय्यरने खोटी बातमी पसरवणाऱ्यांना फटकारत एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे.

श्रेयस अय्यर गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. यात इराणी चषकाचाही समावेश आहे. ज्याचे विजेतेपद मुंबई संघाने 27 वर्षांनंतर जिंकले. अय्यरने रेस्ट ऑफ इंडिया संघाविरुद्धच्या सामन्यात 57 आणि 8 धावा केल्या. दुखापतीमुळे श्रेयस रणजी सामन्यातील त्रिपुराविरुद्धचा सामना खेळणार नसल्याचे काही वृत्तात म्हटले आहे. पण दुखापतीबाबत केलेल्या ट्विटवर श्रेयस संतापला आणि म्हणाला, “खोटी माहिती पसरवण्यापूर्वी आधी याचा नीट अभ्यास करा.” त्यानंतर सोषल मिडीयावर वातावरण तापले आहे. (हेही वाचा: India vs New Zealand 2nd Test 2024 Weather Report: पुण्यात पावसाची किती शक्यता? सामन्याच्या एक दिवस आधी जाणून घ्या हवामान अहवाल)

श्रेयस अय्यर वैयक्तिक कारणांमुळे 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान आगरतळा येथील महाराजा बीर बिक्रम कॉलेज स्टेडियमवर त्रिपुरा विरुद्ध मुंबईच्या रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्याला मुकणार आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाने मुंबईच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीला थोडी विश्रांती देण्याची विनंती केली होती आणि त्याचे अपील मान्य करण्यात आले आहे, असे म्हटले जात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now