T20 क्रिकेटमध्ये एकही शतक न करता ‘या’ स्टार फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस, MS Dhoni चा देखील दिग्गजांच्या यादीत समावेश
मलिक एकही शतक न ठोकता सर्वाधिक धावा करणारा आघाडीचा फलंदाज असून भारताच्या माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा टॉप-5 फलंदाजांच्या यादीत समावेश आहे. मलिक टी -20 क्रिकेटमध्ये आतापर्यंतच्या कारकीर्दीत एकूण 417 सामन्याच्या 389 डावात 37.06 च्या सरासरीने 10,488 रन केल्या आहेत.
Most T20 Runs Without a Century: टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरील चार स्टार फलंदाजांनी 10,000 धावांचा टप्पा गाठला आहे. ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेल या यादीत आघाडीवर असून त्याच्या मागे किरोन पोलार्ड, शोएब मलिक (Shoaib Malik) आणि डेविड वॉर्नर आहेत. तथापि एक गोष्टीत पाकिस्तानचा शोएब मलिक या तिघांपुढे सरस ठरला आहे आणि ते म्हणजे एकही शतक न करता 10 हजार धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. शोएब वगळता गेलने 22 शतके, पोलार्डने एक शतक, तर वॉर्नरने 8 टी-20 शतके केली आहेत. टी-20 क्रिकेटबद्दल बोलायचे तर शोएब मलिक एकही शतक न ठोकता सर्वाधिक धावा करणारा आघाडीचा फलंदाज असून भारताच्या माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) टॉप-5 फलंदाजांच्या यादीत समावेश आहे. (Ravindra Jadeja याच्या ‘तलवारबाजी’ची MS Dhoni ने केली नक्कल, CSK कर्णधाराच्या व्हिडिओवर खुश होऊन अष्टपैलूने दिला ‘हा’ सल्ला)
शोएब मलिक टी -20 क्रिकेटमध्ये एक शतक न करता सर्वाधिक धावा करणारा फक्त नंबर-1 फलंदाजच नाही तर या फॉरमॅटमध्ये एकदाही शतकी धावसंख्या पार न करता 10,000 धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. शोएबने आतापर्यंतच्या कारकीर्दीत एकूण 417 सामन्याच्या 389 डावात 37.06 च्या सरासरीने 10,488 रन केल्या आहेत. त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 95 तर स्ट्राइक रेट 125.99 आहे. दुसर्या क्रमांकावर इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) असून त्याच्या नावावर एकूण 7004 धावा आहेत. श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज कुमार संगकारा तिसर्या क्रमांकावर आहे ज्याने आपल्या टी-20 कारकीर्दीत एकूण 6937 धावा केल्या.तसेच रॉबिन उथप्पा 6861 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे तर एमएस धोनी (MS Dhoni) 6858 धावा करून पाचव्या क्रमांकावर आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये शतकी धावसंख्या पार करणे प्रत्येक फलंदाजासाठी शक्य झालेले नाही आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिस गेल टी-20 क्रिकेटचा बॉस आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीला अद्याप एकदाही या फॉरमॅट मध्ये शतक करता आलेले नाही.