Ravindra Jadeja याच्या ‘तलवारबाजी’ची MS Dhoni ने केली नक्कल, CSK कर्णधाराच्या व्हिडिओवर खुश होऊन अष्टपैलूने दिला ‘हा’ सल्ला

चेन्नई सुपर किंग्जने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून कर्णधार महेंद्र सिंह धोनी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या ट्रेडमार्क ‘तलवारबाजी’च्या सेलिब्रेशनची नक्कल करताना दिसत आहे. सीएसकेने व्हिडिओ अपलोड केल्यावर लगेचच अष्टपैलू आपल्या कर्णधाराला मोठा सल्ला देऊन टाकला.

Ravindra Jadeja याच्या ‘तलवारबाजी’ची MS Dhoni ने केली नक्कल, CSK कर्णधाराच्या व्हिडिओवर खुश होऊन अष्टपैलूने दिला ‘हा’ सल्ला
धोनीकडून जडेजाच्या तलवारबाजी सेलिब्रेशनचे अनुकरण (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) 14 वी आवृत्ती पुढे ढकलण्यात आल्यापासून भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सोशल मीडियावर बराच सक्रिय झाला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) खेळणारा जडेजा आपल्या घोड्यांसह स्वत:चे फोटो शेअर करत असून चाहत्यांना आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि यूकेमध्ये इंग्लंड कसोटी मालिकेसाठी आपल्या तयारीची झलक दाखवत आहे. रविवारी सीएसकेने (CSK) इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या ट्रेडमार्क ‘तलवारबाजी’च्या सेलिब्रेशनची नक्कल करताना दिसत आहे. सीएसकेने व्हिडिओ अपलोड केल्यावर लगेचच अष्टपैलू आपल्या कर्णधाराला मोठा सल्ला देऊन टाकला. (MS Dhoni: महेंद्रसिंह धोनीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पत्नी साक्षीने शेअर केला व्हिडिओ)

जडेजाने टिप्पणी विभागात लिहिले की, “बॅटने प्रयत्न करावेत.” आपल्या अष्टपैलू कौशल्यांबरोबरच जडेजाकडे चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी आणखी बरीच कौशल्ये आहेत. त्याची ‘तलवारबाजी’ सेलिब्रेशन हे त्याच्या फलंदाजीचा एक ट्रेडमार्क बनला आहे आणि अष्टपैलू खेळाडू महत्त्वपूर्ण टप्पे गाठल्यानंतर या उत्सवाची झलक दाखवली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 32 वर्षीय अष्टपैलूला 18 सदस्यीय भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे जडेजाला इंग्लंडविरुद्ध अखेरच्या घरच्या मालिकेसाठी संघातून बाहेर बसावे लागले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

आयपीएल 2021 दरम्यान अष्टपैलू खेळाडूने प्रतिस्पर्धी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि तत्काळ बॅट व बॉल दोन्हीने उत्कृष्ट योगदान दिले. 60 नियोजित सामन्यांपैकी फक्त 29 सामने हंगाम स्थगित होईपर्यंत पूर्ण झाले होते आणि आता उर्वरित खेळ आयोजित करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) भरलेल्या क्रिकेट कॅलेंडरमध्ये एक विंडो शोधणे आवश्यक आहे. यापूर्वी पाच विजयांसह, तीन वेळा आयपीएल चॅम्पियन्स सीएसकेला अधिकृतपणे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित सात सामन्यांतून आणखी तीन विजयांची आवश्यकता होती. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे टी-20 स्पर्धा रद्द करण्यात येण्यापूर्वी सात सामन्यांमध्ये जडेजाने 161 पेक्षा कधिकच्या स्ट्राईक-रेटने 131 धावा केल्या आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 7 पेक्षा कमी धावा देत त्याने 7 विकेट्सही काढल्या.

(The above story first appeared on LatestLY on May 17, 2021 01:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).