Shoaib Malik Completes 10000 T20 Runs: शोएब मलिक याने रचला विक्रम; टी-20 कारकिर्दीत 10 हजार धावा करणारा आशियातील ठरला पहिला खेळाडू
10 हजारांहून अधिक धावा करणारा शोएब मलिक हा आशियातील एकमेव खेळाडू ठरला आहे.
पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिकने (Shoaib Malik) टी-20 क्रिकेटमध्ये (T-20 Cricket) 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. 10 हजारांहून अधिक धावा करणारा शोएब मलिक हा आशियातील एकमेव खेळाडू ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वेस्टइंडीजचा तडाखेबाज खेळाडू क्रिस गेल अव्वल स्थानी आहे. तर, कायरन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत शोएब मलिक तिसरा क्रमांक मिळवला असून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माला त्याने मागे टाकले आहे.
टी-20 कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणारा क्रिस गेल यांनी 404 सामन्यात 38.20 च्या सरासरीने `13 हजार 296 धावा केले आहेत. त्यानंतर कायरन पोलार्डने 518 सामने खेळून 31.51 च्या सरासरीने 10 हजार 370 धावा केल्या आहेत. तर, या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेला शोएब मलिक 395 सामन्यात 37.41 च्या सरासरीने 10 हजार 27 धावापर्यंत पोहचला आहे. हे देखील वाचा- Vernon Philander Brother Shot Dead: दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज वर्नोन फिलेंडरच्या धाकट्या भावाची केप टाउनमध्ये गोळी घालून हत्या
या यादीत न्यूझीलंडचे माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम आहे. त्याने 370 सामने खेळून ज्यात 29. 97 च्या सरासरीने 9 हजार 922 धावा केल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वार्नर पाचव्या क्रमांकावर आहेत. वार्नरने केवळ 288 सामन्यात 37.86 च्या सरासरीने 9 हजार 533 धावा केल्या आहेत. त्यानंतर 292 सामन्यात 35.92 च्या सरासरीने 9, 161 धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ऍरोन फिंच सहाव्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 286 सामन्यात 41.05 च्या सरासरीने 9 हजार 33 धावा करत सातव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारताचा उपकर्णधार रोहित शर्माचा क्रमांक लागतो. रोहित शर्माने 334 सामने खेळून 32.41 च्या सरासरीने 8 हजार 853 धावा केल्या आहेत. त्यानंतर या यादीत नवव्या क्रमांकावर साऊथ अफ्रीकेचा फलंदाज ए बी डिव्हिलियर्स तर, शेन वॉटसन दहाव्या स्थानावर आहे. एबी डिव्हिलियर्सने 315 सामन्यात 37.33 च्या सरासरीने 8 हजार 812 धावा केल्या आहेत. तर, शेन वॉटसनने 338 सामन्यात 29. 41 च्या सरासरीने 8 हजार 707 धावा केल्या आहेत.