Shoaib Akhtar Bowling Record: वेगाच्या ‘या’ बादशाहने आपला विक्रम मोडावा अशी ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ची इच्छा, मानले -‘माझा विक्रम मोडण्याच्या नादात...’
माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर इंडियन प्रीमियर लीगच्या चालू 2022 हंगामात सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या 150kmph + वेगाने प्रभावित झाला आहे. 46 वर्षीय माजी पाकिस्तानी गोलंदाजाने भारतीय गोलंदाजाला आपल्या शरीराची काळजी घेण्याचा सल्ला दिला आणि 100mph चा टप्पा गाठण्याचा त्याचा दीर्घकाळचा विक्रम मोडण्यासाठी त्याला पाठींबा दाखवला.
सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) युवा वेगवान स्टार उमरान मलिकने (Umran Malik) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) चालू 2022 हंगामात आपल्या वेगवान खेळीने सर्वांना प्रभावित केले आहे. हैदराबाद फ्रँचायजीने राखून ठेवलेल्या तीन खेळाडूंपैकी एक असलेल्या जम्मूच्या 22 वर्षीय तरुणाने 5 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 157 किमी प्रतितासचा टप्पा गाठला आणि त्याने सातत्याने 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. त्याच्या वेगाकडे सर्वत्र लक्ष वेधले गेले आहे आणि खेळाडू व चाहत्यांनी त्याचा लवकरात लवकर भारतीय संघात (Indian Team) समावेश करण्याची मागणी केली आहे. आणि लीगच्या चालू हंगामात ऑरेंज आर्मीसाठी त्याच्या शानदार प्रदर्शनाने प्रभावित होऊन, पाकिस्तानचा महान आणि सर्वकाळातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) त्याचा दीर्घकाळाचा विक्रम, 161.3 किमी प्रतितास, मोडण्यासाठी भारतीय तरुणाला पाठिंबा दिला आहे. (‘IPL चा ‘हा’ धडाकेबाज गोलंदाज आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असता जर...’, पाकिस्तानच्या कामरान अकमलचे मोठे विधान)
अख्तरने निक नाइटवर 161.3 कमी प्रतितास वेगाने (100.2 mph) चेंडू टाकला आणि 100-mph अडथळा पार करणारा क्रिकेट इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला. निक नाइटने या चेंडूला लेग-साइडवर खेळला. स्पोर्ट्सकीडा क्रिकेट यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, माजी महान खेळाडू म्हणाला, “मी पहिल्यांदाच 150kmph + सातत्यपूर्ण गोलंदाजी करणाऱ्या व्यक्तीला पाहिले आहे आणि जर त्याने (उमरान) माझा (सर्वात वेगवान चेंडूचा) विक्रम मोडला तर मला आनंद होईल. खंडित करा, नक्कीच खंडित करा, परंतु स्वत: ला नाही. मला त्याची प्रदीर्घ कारकीर्द बघायची आहे. काही दिवसांपूर्वीच मला कोणीतरी म्हणत होते की 20 वर्षे झाली आणि तुझा रेकॉर्ड अजूनही तुटलेला नाही. पण मला विश्वास आहे की विक्रम मोडण्यासाठी असतात आणि जर त्याने (उमरान) तसे केले तर मला आनंद होईल.” तथापि, दिग्गजाने उमरानला शक्य तितक्या वेगवान गोलंदाजीचा प्रयत्न करण्यासाठी त्याची हाडे मोडू नयेत असा इशारा देखील दिला. “मला आशा आहे की तो तंदुरुस्त राहील आणि त्याला दुखापत होणार नाही आणि भरपूर क्रिकेट खेळत राहिल. त्याने अशा दुखापतीपासून दूर राहिले पाहिजे ज्यामुळे त्याचे करिअर थांबू शकते.”
रावळपिंडी एक्सप्रेसने मलिकला हे देखील लक्षात ठेवण्यास सांगितले आहे की त्याने 10-15 वर्षे भारतासाठी सर्वोच्च स्तरावर खेळायचे आहे आणि BCCI व संघ व्यवस्थापनाने उमरानच्या क्रिकेट कारकिर्दीला लांबणीवर टाकण्यासाठी त्याच्या कार्यभाराचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करावे अशी इच्छा आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)