GT vs PBKS, IPL 2024: शिखर धवन आजच्या सामन्यात करु शकतो मोठा विक्रम, विराट कोहलीची करणार बरोबरी
मोसमातील दुसरा विजय नोंदवण्यासाठी तो या सामन्यात उतरेल. त्याचबरोबर विराट कोहलीचा (Virat Kohli) एक मोठा विक्रमही त्याच्या निशाण्यावर असणार आहे.
GT vs PBKS, IPL 2024: आयपीएल 2024 चा 17 वा (IPL 2024) सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (DC vs PBKS) हे संघ आमनेसामने असतील. पंजाबचा कर्णधार शिखर धवनसाठी (Shikhar Dhawan) हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. मोसमातील दुसरा विजय नोंदवण्यासाठी तो या सामन्यात उतरेल. त्याचबरोबर विराट कोहलीचा (Virat Kohli) एक मोठा विक्रमही त्याच्या निशाण्यावर असणार आहे. पहिल्या सत्रापासून या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये धवनचे नाव येते. शिखर धवनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 220 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 35.55 च्या सरासरीने 6754 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 51 अर्धशतक आणि 1 शतक झळकावले आहे.
शिखर धवन करु शकतो मोठा विक्रम
आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण गुजरातविरुद्ध अर्धशतक ठोकल्यास तो या यादीत संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. सध्या विराट कोहली 52 अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: GT vs PBKS, IPL 2024 Head to Head: आयपीएलमध्ये गुजरात आणि पंजाबची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, येथे पाहा आश्चर्यकारक आकडेवारी)
आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारे खेळाडू
डेव्हिड वॉर्नर - 62 अर्धशतके
विराट कोहली – 52 अर्धशतके
शिखर धवन – 51 अर्धशतके
रोहित शर्मा - 43 अर्धशतके
एबी डिव्हिलियर्स – 40 अर्धशतके
पंजाब किंग्जची मोसमाची खराब सुरुवात
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जला या मोसमात फारशी सुरुवात झालेली नाही. या संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले असून 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिखर धवनच्या पंजाबने सीझनची सुरुवात घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार विजयाने केली, परंतु त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्याविरुद्ध त्यांचे दोन्ही सामने गमावले.