शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांना बीसीसीआयचा झटका; ए प्लस श्रेणीतून बाहेर
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवर शिखर धवन आणि फास्टर बॉलर भुवनेश्वर कुमार यांना बीसीसीआयने जबरदस्त झटका दिला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि फास्टर बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) यांना बीसीसीआयने (BCCI) जबरदस्त झटका दिला आहे. बीसीसीआयने त्या दोघांनाही ए प्लस श्रेणीतून (A+ category) बाहेर केले आहे. गुरुवारी (7 मार्च) रात्री बीसीसीआयने ही घोषणा केली. तर शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांची ए प्लस श्रेणीतील जागा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतने पटकावली आहे.
बीसीसीआयनुसार आता केवळ तीन खेळाडू ए प्लस श्रेणीत आहेत. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि फास्टर बॉलर जसप्रीत बुमराह.
ए श्रेणीतील खेळाडू :
एमएस धोनी, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन, इशान्त शर्मा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे.
बी श्रेणीतील खेळाडू:
चिनमान कुलदीप, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, के.एल. राहुल, हार्दिक पंड्या, उमेश यादव, युजवेन्द्र चहल.
सी श्रेणीतील खेळाडू:
दिनेश कार्तिक, अंबाती रायडू, मनिष पांडे. हनुमा विहारी, केदार जाधव, खलील अहमद, रहिमान साहा.