'Shift The World Cup 2019 To...': अमिताभ बच्चन म्हणाले या देशाला करु द्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, कारण वाचून तुमचं हसू आवरणार नाही
गुरुवारी होणारा न्यूझीलंड विरुद्ध भारताचा सामना पावसामुळे रद्द केल्यानंतर लाखो चाहत्यांप्रमाणे अमिताभ यांनी देखील सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे क्रिकेट चे प्रबळ प्रशंसक आहे, हे जग जाहीर आहे आणि सध्या इंग्लंड (England) मध्ये असलेल्या विश्वकप चे सगळे सामने त्यांनी आवर्जून पहिले आहे. गुरुवारी होणारा न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भारताचा (India) सामना पावसामुळे रद्द केल्यानंतर लाखो चाहत्यांप्रमाणे अमिताभ यांनी देखील सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. (ओव्हल मैदानाबाहेर परदेशी भेळपुरी विक्रेत्याला पाहून अमिताभ बच्चन यांचे खास ट्विट)
अमिताभ सोशल मीडिया वर विनोद केला की, 'हि स्पर्धा भारतात हलविला जावो कारण येथे काही पाऊस पडतो.' अमिताभ यांनी हे पोस्ट करताच नेटिझन्स ने सुद्धा अभिनेत्याशी सहमत दाखवली.
भविष्यात इंग्लंडमध्ये कोणत्याही World Cup चे आयोजन करू नका किंवा पाऊस पडल्यास सामना दुसऱ्या दिवशी केळवावा
भारत संघ अपराजित, न्यूझीलंडचा संघ अपराजित आणि पाऊस ही अपराजित
गुरुवारी होणार भारत-न्यूझीलंड सामना इंग्लंड मध्ये होणाऱ्या सतत पावसामुळे रद्द केला गेला. चाहत्यांनी आयसीसीवर आपला राग Twitter द्वारे व्यक्त केला. सध्या Twitter वर #ShameOnICC अशे हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
पुढे भारताचा सामना पाकिस्तान (Pakistan) शी ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम (Old Trafford Stadium) वर 16 जून रोजी खेळाला जाईल. 3 पैकी 2 विजयासह भारतीय ICC गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर तर पाकिस्तानी संघ 4 पैकी 1 सामना जिंकून आठव्या स्थानावर आहे.