Ashes 2019: शेन वॉर्नने निवडला इंग्लंड-ऑस्ट्रेलिया 12 सदस्यीय अॅशेस संघ; जोफ्रा आर्चर, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश

अॅशेस मालिका सुरु होण्याआधी माजी ऑस्ट्रेलियाई फिरकीपटू शेन वॉर्नयांनी दोन्ही, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघासाठी 12 खेळाडूंची निवड केली आहे.

स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात 1 ऑगस्ट पासून प्रसिद्ध अॅशेस (Ashes) मालिका खेळली जाणार आहे. आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकनंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ अॅशेस सिरीजवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. दोन्ही देशातील क्रिकेटरसिकांना अॅशेस सिरीजची उत्सुकता लागलेली असते. अॅशेस मालिका दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेची मानली जाते. या दोन देशाचे क्रिकेटमधील नातेदेखील बदलले आहे. काही वर्षांपूर्वी जो ऑस्ट्रेलियाचा संघ होता तसा तो आता राहिला नाही. जे की इंग्लंडसाठी चांगली बातमी आहे. आता पुढील काही महिने चालणाऱ्या अॅशेस मालिकेट ऑस्ट्रेलियाला हरवून पुन्हा विजय साजरा करण्यात इंग्लंडमधील नागरिकांचे सुख सामावलेले असेल. (ENG vs AUS, Ashes 2019: डोक्याला दुखापत झाल्यास सबस्टिट्यूट खेळाडूला ही बॅटिंग! अॅशेस पासून नियम लागू होण्याची शक्यता)

दरम्यान, अॅशेस मालिका सुरु होण्याआधी माजी ऑस्ट्रेलियाई फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) यांनी दोन्ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघासाठी 12 खेळाडूंची निवड केली आहे. यात त्यांनी इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचा समावेश केला आहे. आर्चर पहिल्यांदा इंग्लंडसाठी अॅशेस मालिका खेळणार आहे. विश्वचषकमधील प्रभावी खेळीनंतर आर्चरची निवड करण्यात आली होती. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नने माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि माजी उपकर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) यांना समाविष्ट केले आहेत.

हे आहे वॉर्नचे इंग्लंडसाठीचे 12:

जेसन रॉय , जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, बेन फॉक्स (विकेटकीपर), मोईन अली, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, मार्क वूड, आणि जॉन क्रॉली

वॉर्नने हे देखील म्हटले की, "जर ककोनी दुसरा फलंदाज जास्त धावा करत असेल तर मी त्याला देखील निवडीन. परंतु, फॉक्स एक चांगला पर्याय आहे. 12 वा खेळाडू परिस्थितीवर अवलंबून आहे."

हे आहे वॉर्नचे ऑस्ट्रेलियासाठीचे 12:

डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ट्रेविस हेड, टीम पेन, जेम्स पॅटिन्सन, पॅट कमिन्स, नॅथन लिऑन, मिशेल स्टार्क/जोश हेझलवूड.

वॉर्न यांनी अॅलेक्स केरी, जय रिचर्डसन, कॅमरून बँक्रॉफ्ट, मिशेल मार्श व विल पुकोव्स्की यांचाही समावेश केला आहे.

यंदाच्या सीरिजपासून आयसीसीकडून सबस्टिट्यूट खेळाडूचा नवीन नियम लागू होऊ शकतो. एखाद्या खेळाडू्च्या डोक्याला जखम झाली तर त्या खेळाडूऐवजी सबस्टिट्यूट खेळाडू खेळू शकतो.