IND vs NZ World Cup Semi-Final 2019: न्यूझीलंड विरुद्ध झुंझार खेळीबद्दल संजय मांजरेकर कडून रवींद्र जडेजा याचे कौतुक, वाचा (Tweet)
जडेजाने झुंझार खेळी करत 59 चेंडूत 77 धावा केल्या. जडेजाच्या या खेळीचीचे कौतुक करत भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या.
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक सेमीफाइनलमध्ये भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करत भारतीय संघाला 211 धावाच करता आल्या. भारतीय संघाला नमवून न्यूझीलंड संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियासाठी एम एस दोनी (MS Dhoni) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी आक्रमक खेळी केली आणि संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. जडेजाची खेळी मात्र संघासाठी महत्वाची होती. जडेजाने झुंझार खेळी करत 59 चेंडूत 77 धावा केल्या पण ती व्यर्थ झाली. (Ind vs NZ, CWC Semi Final 2019: न्यूझीलंड कडून टीम इंडिया 18 धावांनी पराभूत, किवी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांची शरणागती)
दरम्यान, जडेजाच्या या खेळीचीचे कौतुक करत भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. मांजरेकर यांनी लिहिले, "वेल प्लेड जडेजा".
याआधी, मांजरेकर यांनी जडेजाला 'बिट्स ऍण्ड पिसेस' खेळाडू असल्याचं म्हणाले होते. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी इंग्लंड विरुद्ध मॅचमध्ये खराब कामगिरी केली होती. यानंतर एका स्पिनरला काढून जडेजाला संधी द्यावी का, असा प्रश्न मांजरेकर यांना विचारण्यात आला होता. तेव्हा 'मी थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करु शकणाऱ्या जडेजासारख्या खेळाडूंचा चाहता नाही. जडेजा हा सध्या त्याच्या 50 ओव्हरच्या कारकिर्दीमध्ये असा खेळाडू आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र तो पूर्ण बॉलर आहे. 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये मी टीममध्ये बॅट्समन आणि स्पिनरना संधी देईन', असं मांजरेकर म्हणाले होते.