Sourav Ganguly Birthday: हॅप्पी बर्थडे दादा! भारताला लढायला शिकवणाऱ्या सौरव गांगुलीला क्रिकेट विश्वातून शुभेच्छा, मोहम्मद कैफच्या ट्विटची चर्चा

टीम इंडियाला लढायला आणि जिंकायला शिकवलेला कर्णधार म्हणून माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली ओळखला जातो. भारतीय क्रिकेटचा दादा असलेल्या गांगुलीचा आज 48 वा वाढदिवस आहे. गांगुलीने 48 वर्ष पूर्ण केल्याबद्दल अनेक माजी आणि सध्याचे क्रिकेटपटू त्याला शुभेच्छा देत आहेत. आयसीसीने गांगुलीला शुभेच्छा देताना त्याची उपलब्धी सांगितली.

सौरव गांगुलीला क्रिकेट विश्वातून शुभेच्छा (Photo Credit: Twitter)

टीम इंडियाला लढायला आणि जिंकायला शिकवलेला कर्णधार म्हणून माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली ओळखला जातो. भारतीय क्रिकेटचा दादा असलेल्या गांगुलीचा आज 48 वा वाढदिवस आहे. प्रेमाने 'दादा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांगुलीला आपल्या आक्रमक कारकीर्दीत भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवून आणण्याचे श्रेय दिले जाते. गांगुलीने कर्णधारपदी असताना आपल्या निर्णयाने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलून टाकला. भारतीय संघ म्हणजे ‘घरके शेर’ हा शिक्का पुसण्यात दादाच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. गांगुलीच्या नेतृत्वात खेळातील अनेक युवा खेळाडूंनी पदार्पण केले. युवराज सिंह, हरभजन सिंह आणि एमएस धोनीसह अनेकांचा या यादीत समावेश आहे. गांगुलीने 48 वर्ष पूर्ण केल्याबद्दल अनेक माजी आणि सध्याचे क्रिकेटपटू त्याला शुभेच्छा देत आहेत. आयसीसीने गांगुलीला शुभेच्छा देताना त्याची उपलब्धी सांगितली. वनडे क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा तिसरा जलद फलदांज आहे. (Happy Birthday Sourav Ganguly: सौरव गांगुली, एक कर्णधार ज्याने टीम इंडियाला शिकवली 'दादागिरी', दादाच्या क्रिकेटमधील दादागिरीचे 'हे' किस्से जाणून घ्या)

गांगुलीचा सर्वाधिक यशस्वी सलामी जोडीदार असलेल्या सचिन तेंडुलकरने ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. तेंडुलकरने लिहिले, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादी! आशा आहे की आमची मैदानावरील मैदानाची भागीदारी आमच्या मैदानावरील मैदानाप्रमाणेच कायम राहील. तुम्हाला पुढील वर्षाच्या शुभेच्छा."

कैफने दोन फोटो शेअर करून गांगुलीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. कोलकाताच्या आवडत्या हिरोच्या नेतृत्वात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद कैफने लिहिले, "एक उत्कृष्ट फलंदाज पासून एक उत्कृष्ट कर्णधार आणि आता संपूर्ण आघाडीचा भारतीय क्रिकेटर. माझे आवडते कर्णधार आणि मार्गदर्शक सौरव गांगुली यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पण, पोलाद छाती दाखवून कोणी चढत का, दादा."

गांगुलीबरोबर ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणने लिहिले, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सौरव गांगुली. आपणास आणखी यश आणि अधिकाधिक प्रेम मिळो."

माजी भारतीय सलामीवीर आकाश चोपडाने लिहिले, "पुरुषांचा नेता. ऑफसाइडचा देव. फाइटर. वाढदिवसाच्या शुभेच्छा, दादा."

दरम्यान भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज इशांत शर्माने लिहिले, “शुभो वाढदिवस दादा. अनेकांसाठी खरी प्रेरणा! तुम्हाला खूप प्रेम आणि शुभेच्छा! चांगला क्वायरन्टाइन बर्थडे!"

गांगुलीची पहिली इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सने लिहिले, "कोलकाताचे दादा, भारताचा अभिमान, पहिल्या नाईट्सचा नेता, वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

प्रज्ञान ओझा

आरपी सिंह

आयसीसी

दरम्यान, गांगुलीने भारताकडून 113 कसोटी सामने खेळला ज्यामध्ये त्याने 16 शतकं, 35 अर्धशतकांसह 7212 धावा केल्या. शिवाय, कसोटीत त्याने 32 विकेट्सही घेतल्या. वनडेमध्ये गांगुलीने 311 सामन्यात 22 शतकं, 72 अर्धशतकांसह 11,363 धावा ठोकल्या आणि 100 विकेट्स घेतल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now