Ramakant Achrekar's Memorial in Shivaji Park: द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी पार्क मैदानात खास स्मारकाचं Raj Thackeray,Sachin Tendulkar यांच्या हस्ते अनवारण (Watch Video)
होतकरू क्रिकेटर्सना प्रेरणा म्हणून हे स्मारकं मदत करेल अशी भावना राज ठाकरेंसह रमाकांत आचरेकर यांच्या शिष्यांनी व्यक्त केली आहे.
सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर यांच्यासह अनेक क्रिकेटर्सना घडवणार्या रमाकांच आचरेकर (Ramakant Achrekar) यांच्या स्मरणार्थ दादर च्या छत्रपती शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात खास स्मारकाचं उद्घाटन करण्यात आले आहे. आज रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीच्या दिवसाचं औचित्य साधत हा अनावरण सोहळा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रोजेक्टच्या सल्लागारांपैकी एक आहेत. त्यांनी पुतळ्याऐवजी प्रतिकात्मक स्वरूपात बॅट, स्ट्म्प, ग्लोव्ह्स यावर आचरेकर सरांची ओळख असलेली कॅप ठेवत हे स्मारक आता खुलं केलं आहे.
शिवाजी पार्क मध्ये आयोजित या कार्यक्रमाला रमाकांत आचरेकर यांची लेक विशाखा दळवी आणि कुटुंब हजर होते सोबतच आचरेकर सरांनी घडवलेले शिष्य उपस्थित होते. त्यामध्ये अर्थातच सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी. प्रविण आंब्रे आदि शिष्य उपस्थित होते.
रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं अनावरण
रमाकांत आचरेकर यांचं 2019 मध्ये मुंबईत निधन झाले आहे. टीम इंडियामध्ये चमकदार कामगिरी केलेले अनेक खेळाडू आचरेकरांनी घडवले आहेत. त्यांच्या कार्याला भारत सरकार कडून 2010 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने गौरवले आहे. तर 1990 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला होता.
रमाकांत आचरेकर यांनी घडवलेले खेळाडू
भारताकडून खेळायला गेलेल्या खेळाडूंमध्ये रामनाथ पारकर, बलविंदर सिंग संधू, लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित, प्रविण आमरे, समीर दिघे, विनोद कांबळी, संजय बांगर, पारस म्हांबरे, रमेश पोवार, अजित आगरकर आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)