SA W vs SCO W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: आजचा टी 20 विश्वचषक सामना दक्षिण आफ्रिका आणि स्कॉटलंड मध्ये; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल येथे जाणून घ्या
उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.
SA W vs SCO W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 चा 10 वा सामना दक्षिण आफ्रिका महिला (SA vs SCO) संघाविरुद्ध स्कॉटलंड महिला संघात आज म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टी 20 विश्वचषक स्पर्धेत(Womens T20 World Cup 2024) दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पण दुसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला स्कॉटलंडविरुद्ध स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे. दुसरीकडे, स्कॉटलंडला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदविण्याकडे स्कॉटलंडचे लक्ष असेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा: 2024 ICC Women’s T20 World Cup Points Table Update: न्यूझीलंडवर 60 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानी; महिला टी 20 विश्वचषकाचे पॉईंट टेबल पहा)
सामना कधी खेळला जाईल?
आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 चा 11 वा सामना बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी होईल. दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध स्कॉटलंड महिला यांच्यात खेळवला जाईल.
थेट सामना कुठे आणि कसा पहाल?
आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 चे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जात आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांना टीव्हीवर दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध स्कॉटलंड महिला यांच्यातील सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय, डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह-स्ट्रीम केले जाईल.
दोन्ही संघांचे खेळाडू
स्कॉटलंड महिला संघ: सास्किया हॉर्ले, सारा ब्राइस (विकेटकीपर), कॅथरीन ब्राइस (कर्णधार), आयल्सा लिस्टर, प्रियानाझ चॅटर्जी, लोर्ना जॅक, डार्सी कार्टर, कॅथरीन फ्रेझर, रेचेल स्लेटर, अबटा मकसूद, ऑलिव्हिया बेल, क्लो एबेल, मेगन मॅकॉल, हन्ना रेनी, ॲबी एटकेन ड्रमंड
दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, ॲनी डेर्कसेन, सुने लुस, नदिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, तुमी सेखलुका, तुमी सेखलुका , शेषनी नायडू, माईके डी रिडर