RR vs KKR, IPL 2020: राजस्थान रॉयल्सची शिस्तबद्ध कामगिरी; जोफ्रा आर्चरने घेतल्या 2 विकेट्स, KKRने दिले दिले 175 धावांचे लक्ष्य
आयपीएलच्या 12व्या मॅचमध्ये टॉस गमावून पहिले फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 174 धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्सला 175 धावांचे लक्ष्य दिले. राजस्थानने आज शिस्तबद्ध गोलंदाजी केली आणि केकेआरला मोठा स्कोर करण्यापासून रोखले. केकेआरकडून शुभमन गिलने सर्वाधिक 47 इयन मॉर्गन 34, आंद्रे रसेलने 24 धावा केल्या.
आयपीएलच्या (IPL) 12व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) टॉस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) बॅटिंग करण्यासाठी सांगितले. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ही मॅच होत आहे. आजच्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करत केकेआरने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 174 धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्सला 175 धावांचे लक्ष्य दिले. राजस्थानने आज शिस्तबद्ध गोलंदाजी केली आणि केकेआरला मोठा स्कोर करण्यापासून रोखले. केकेआरकडून सलामी फलंदाज शुभमन गिलने Shubman Gill) सर्वाधिक 47 धावा केल्या, इयन मॉर्गन (Eoin Morgan) 34, आंद्रे रसेल 24 आणि नितीश राणाने 22 धावा केल्या. दुसरीकडे, राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने चेंडूने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आणि 2 विकेट घेतल्या. अंकित राजपूत, जयदेव उनाडकट आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (IPL 2020: आयपीएल Points Tableमध्ये एमएस धोनीच्या CSKची अंतिम स्थानी घसरण, नेटकऱ्यांनी खिल्ली उडवत केलं ट्रोल, पाहा Tweets)
आजच्या सामन्यासाठी दोन्ही टीमने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केले नाही. टॉस गमावून केकेआरसाठी शुभमन आणि नारायणने डावाची सुरुवात केली. दोघांनी टीमसाठी सावध सुरुवात केली. नारायण फटकेबाजी करत असताना उनाडकटने 36च्या धावसंख्येवर विंडीज फलंदाजाला बाद करून टीमला मोठे यश मिळवून दिले. नारायणने 15 धावा केल्या. त्यानंतर शुभमनसोबत नितीशने डाव पुढे नेला, पण दोघे मोठी भागीदारी करू शकले नाही. नितीश 22 धावांवर बाद झाला, त्यानंतर शुभमन देखील 47 धावा करून माघारी परतला. त्यानंतर रसेलने मोठे शॉट खेळले, पण तो देखील जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि 24 धावांवर राजपूतने कॅच आऊट केले. कर्णधार दिनेश कार्तिकने यंदाही बॅटने निराश केले. दिनेश एकच धाव करू शकला. पॅट कमिन्सने 12 धावा केल्या. मॉर्गन आणि कमलेश नागरकोटी धावा करून नाबाद परतले.
दरम्यान, राजस्थान आणि कोलकाता यांच्यात नेहमीच जोरदार सामने पाहायला मिळाले आहेत. दोन्ही टीममध्ये आजवर 20 सामने झाले, ज्यातील दोघांनी प्रत्येकी 10 सामने जिंकले आहेत. शिवाय, युएईमध्ये राजस्थानविरुद्ध केकेआरला एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)