RR vs KKR, IPL 2020: राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकत केला गोलंदाजीचा निर्णय, पाहा KKR, रॉयल्सचा प्लेइंग इलेव्हन
राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाईल. आजच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील इंडियन प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) 12वा सामना दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल. राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाईल. आजच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना राजस्थान आणि कोलकाताचा तिसरा सामना आहे. राजस्थानने आजवर आपले दोन्ही सामानाने जिंकले तर कोलकाताने एका सामन्यात पराभव तर दुसऱ्यात पराभव नोंदवला. दरम्यान, एकीकडे आजच्या सामन्यात राजस्थान विजयाची हॅटट्रिक करण्याच्या निर्धारित असतील तर कोलकाता आपल्या दुसऱ्या विजयाच्या शोधात असतील. राजस्थानने आपल्या दोन्ही सामन्यात 200 हुन अधिकचा स्कोर केला आहे त्यामुळे कोलकातासमोर कडवे आव्हान असेल. आजच्या सामन्यासाठी राजस्थानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला नाही. (IPL 2020: KKRविरुद्ध आयपीएल सामन्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज, 'डॉन' स्टाईलमध्ये दिली चेतावणी Watch Video)
राजस्थानकडून मागील सामन्यात जोस बटलरने आयपीएलमध्ये एंट्री केली आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथसह डावाची सुरुवात केली. आज पुन्हा बटलर आणि स्मिथ पहिले फलंदाजीसाठी एकत्र येतील. संजू सॅमसन तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल. जोफ्रा आर्चर आणि टॉम कुरन वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. मागील सामन्यातील राजस्थानचा नायक ठरलेला राहुल तेवतियाकडे पुन्हा एकदा टीमकडून मोठ्या अपेक्षा असतील. दुसरीकडे, केकेआरकडून शुभमन गिल आणि सुनील नारायण डावाची सुरुवात करतील. केकेआरच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्यात निराश केले असले तरी शुभमनने मागील सामन्यात डावाची सुरुवात करून महत्वपूर्ण डाव खेळला. मधल्याफळीत मॉर्गनने फिनिशरची भूमिका बजावली आणि टीमला विजयी रेषा ओलांडून दिली. पॅट कमिन्स केकेआरकडून पुन्हा एकदा केकेआरचा मुख्य गोलंदाज असेल. वरुण चक्रवर्ती आणि युवा कमलेश नागरकोटी देखील प्रभावी कामगिरी करू पाहतील. अष्टपैलू आंद्रे रसेल देखील मागील दोन सामन्यात प्रभावी कामगिरी बजावू शकला नसल्याने आजच्या सामन्यात तो आपल्या जुना फॉर्म दर्शवू पाहिलं.
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे प्लेइंग इलेव्हन:
कोलकाता नाईट रायडर्स: शुभमन गिल, सुनील नारायण, नितीश राणा, दिनेश कार्तिक (कॅप्टन आणि विकेटकीपर), इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, शिवम मावी आणि पॅट कमिन्स.
राजस्थान रॉयल्स: स्टीव स्मिथ (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल तेवतिया, टॉम कुरन, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, अंकित राजपूत आणि जयदेव उनाडकट.