RR vs DC, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल, तर टॉस अर्धातास अधिक म्हणजे 7:00 वाजता होईल.
RR vs DC, IPL 2020 Live Streaming: माजी चॅम्पियन राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील आयपीएल 2020चा 23वा सामना शारजाह येथे खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सने या मैदानावर दोन सामने जिंकले आहेत, तर दुबईत खेळल्या गेलेल्या एका सामन्यात आणि अबू धाबी येथे दोन सामन्यात विजय मिळवला आहे. आजवर शारजाहमध्ये (Sharjah) सामन्यात संघांनी मोठी धावसंख्या केली आहे, अशा परिस्थितीत राजस्थान आणि दिल्लीमधील सामन्यात पुन्हा एकदा चौकार-षटकरांची बरसात पाहायला मिळू शकते. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल, तर टॉस अर्धातास अधिक म्हणजे 7:00 वाजता होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये SRHची तिसऱ्या स्थानी झेप, किंग्स इलेव्हन पंजाब तळाशी)
शारजाह येथील आजच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात राजस्थान पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी उत्सुक असतील. रॉयल्स फलंदाजांनी आजवर सभ्य कामगिरी बजावली. स्टिव्ह स्मिथ, सजू समसन यांनी आघाडीवर फलंदाजी करून मोठे डाव खेळले आहेत, पण त्यांची मधली फळी अद्याप कमजोर दिसत आहे. मात्र, त्यांच्यासाठी आनंदाची बाब म्हणजे जोस बटलर मागील सामन्यातून लयीत परतला आहे. दुसरीकडे, या हंगामात आजवर दिल्ली कॅपिटल्स उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील टीमला आजवर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पाहा राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ:
राजस्थान रॉयल्स: स्टिव्ह स्मिथ (कॅप्टन), बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्र्यू टाय, कार्तिक त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, मयंक मारकंडे, महिपाल लोमरोर, ओशाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, आकाश सिंह, जोफ्रा आर्चर, डेविड मिलर, जोस बटलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण आरोन, टॉम कुरन, रॉबिन उथप्पा आणि अनिरुद्ध जोशी.
दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन ), कगिसो रबाडा, मार्कस स्टोइनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, डेनियल सॅम्स, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, एनरिच नोर्ट्जे, रिषभ पंत, हर्षल पटेल आणि कीमो पॉल.