Rohit Sharma च्या नेतृत्वाखाली Team India ने रचला इतिहास, प्रथमच तिन्ही फॉरमॅटमध्ये भारत बनला नंबर वन

कसोटीत नंबर वन बनून भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

Team India No. 1 ICC Ranking: भारतीय क्रिकेट संघाने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने (Team India) मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर या विजयासह टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर (ICC Test Ranking) पोहोचली आहे. कसोटीत नंबर वन बनून भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. भारतीय क्रिकेट संघ इतिहासात प्रथमच तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन (Team India No.1 ICC All Format) बनला आहे. टीम इंडिया आधीच वनडे आणि टी-20 मध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान होती, पण आता भारतीय संघाने कसोटीतही अव्वल स्थान गाठले आहे. पहिल्या कसोटीत एक डाव आणि 132 धावांच्या विजयासह टीम इंडियाचे 132 रेटिंग गुण झाले आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ 126 गुणांवरून थेट 111 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे.

ICC Test Ranking (Source: ICC Website)
ICC ODI Ranking (Source: ICC Website)
ICC T20 Ranking (Source: ICC Website)

असे कधील घडले नव्हते

आम्ही तुम्हाला सांगतो की आजपर्यंत टीम इंडिया कधीही एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनलेली नाही. म्हणजेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला आहे. एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन होण्याचा विक्रम फक्त दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिका 2013 मध्ये एकाच वेळी वनडे, कसोटी आणि टी-20 मध्ये नंबर वन संघ बनला होता. आफ्रिकन संघानंतर पुन्हा कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र रोहितच्या सेनेने 10 वर्षांनंतर हे स्थान मिळवले आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 2nd Test 2023: दिल्ली कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाच्या 'या' गोलंदाजांपासून राहवे लागेल सावध, अन्यथा विजयाचे स्वप्न भंगणार)

क्रमवारी कसा आहे भारत?

सध्याच्या आयसीसी कसोटी क्रमवारीतील स्थिती पाहिल्यास भारतीय संघ 115 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ 111 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय इंग्लंडचा संघ 106 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ 100 गुणांसह आहे. पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा संघ 85 गुणांसह आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा संघ 79 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.