Rohit Sharma IND vs NZ: रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! न्यूझीलंडकडून मालिका पराभवानंतर आली ही नामुष्की

आम्ही चांगले क्रिकेट खेळू शकलो नाही, असे तो म्हणाला. रोहित म्हणाला, कसोटी मालिकेतील पराभव पचवणे सोपे नाही. आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही आणि मला ते मान्य आहे.

Rohit Sharma (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test Match Day 3 Live Streaming:  कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 25 धावांनी पराभव केला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या विजयासह न्यूझीलंडने मालिका 3-0 अशी खिशात घातली. टीम इंडियाच्या पराभवासह रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. घरच्या मैदानावर कसोटी मालिका 3-0 ने गमावणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. (हेही वाचा - New Zealand Beat India 3rd Test 2024 Day 3: मुंबईच्या मैदानावर न्यूझीलंडने रचला इतिहास; भारतावर 25 धावांनी मात करत मालिकेवर 3 -0 ने केला कब्जा )

टीम इंडियाच्या कसोटी इतिहासात घरच्या मैदानावर मालिकेत व्हाईटवॉशचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तीन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला अद्याप घरच्या मैदानावर व्हाईटवॉशचा सामना करावा लागला नव्हता. हा विजय न्यूझीलंडसाठी ऐतिहासिक ठरला. भारताला कसोटी मालिकेत 3-0 ने पराभूत करणारा हा चौथा संघ ठरला आहे. याआधी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने ही कामगिरी केली आहे.

सामन्यानंतर रोहित शर्माने आपली चूक मान्य केली

पराभवानंतर रोहितने आपली चूक मान्य केली. आम्ही चांगले क्रिकेट खेळू शकलो नाही, असे तो म्हणाला. रोहित म्हणाला, कसोटी मालिकेतील पराभव पचवणे सोपे नाही. आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही आणि मला ते मान्य आहे. ते आमच्यापेक्षा खूप चांगले खेळले. आमच्याकडूनही खूप चुका झाल्या.

न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय -

न्यूझीलंडने कसोटी मालिकेतील पहिला सामना 8 विकेटने जिंकला. हा सामना बंगळुरूमध्ये खेळला गेला. दुसरी कसोटी 113 धावांनी जिंकली. हा सामना पुण्यात झाला. यानंतर मुंबईने ही कसोटी 25 धावांनी जिंकली. न्यूझीलंडने मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात 235 धावा आणि दुसऱ्या डावात 174 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 263 धावा आणि दुसऱ्या डावात 121 धावा केल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif