क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रीवाबा जडेजाचा 'भाजपा'मध्ये प्रवेश
भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजा याची पत्नी रीवाबा जडेजाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रीवाबा जडेजाने (Rivaba Jadeja) भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे. गुजरातचे कृषीमंत्री आर. सी. फलदू (Agriculture Minister R C Faldu) आणि खासदार पूनम माडम (MP Poonam Madam) यांच्या उपस्थितीत रीवाबाने भाजपामध्ये प्रवेश केला.
रीवाबाने दिल्लीतून इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेतले असून ती करणी सेनेत कार्यरत होती. समाजसाठी चांगलं काहीतरी करण्याच्या उद्देशाने भाजपात प्रवेश केल्याचं रीवाबाने सांगितलं.
एप्रिल 2016 मध्ये रीवाबा आणि रवींद्र जडेजा विवाहबद्ध झाले. जून 2017 मध्ये दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले.
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर अनेक कलाकार, सेलिब्रेटी विविध पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. त्यात आता रीवाबा जडेजाची देखील भर पडली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
R Praggnanandhaa: ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचा विजेता; टायब्रेकरमध्ये वाचियर-लाग्रेव्हचा केला पराभव
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement