CSK New Captain: ऋतुराज गायकवाड होणार सीएसकेचा चौथा कर्णधार, धोनीशिवाय 'या' खेळाडूंनीही हाती घेतली होती कमान
ऋतुराज चेन्नई सुपर किंग्जचा चौथा कर्णधार असेल.
IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम 22 मार्चपासून (IPL 2024) सुरू होत आहे. पहिल्या लढतीत गेल्या मोसमातील विजेते चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (CSK vs RCB) होणार आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे फ्रँचायझीचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ऋतुराज चेन्नई सुपर किंग्जचा चौथा कर्णधार असेल. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनीशिवाय सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनीही फ्रँचायझीची जबाबदारी सांभाळली आहे. (हे देखील वाचा: IPL 2024 Last Chance Five Players: असे पाच भारतीय खेळाडू ज्यांच्यां बुडत्या कारकिर्दीला आयपीएलमध्ये मिळू शकते शेवटची संधी, जाणून घ्या कोण आहे ते)
धोनीने 235 सामन्यांमध्ये भूषवले कर्णधारपद
चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 235 सामने खेळले आहेत. या कालावधीत संघाने 142 सामने जिंकले असून 90 सामने गमावले आहेत. 1 सामना बरोबरीत तर 2 अनिर्णित राहिले. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 6 सामने खेळले आहेत आणि फक्त 2 जिंकले आहेत. रैनाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 3 सामने गमावले आणि 1 सामना बरोबरीत सुटला.
जडेजाकडे सोपवण्यात आली होती कमांड
आयपीएल 2022 पूर्वी रवींद्र जडेजाची चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जडेजाच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 8 सामने खेळले आणि फक्त 2 जिंकले. संघाला 6 सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. यानंतर धोनीला पुन्हा फ्रँचायझीचा कर्णधार बनवण्यात आले. अशा परिस्थितीत या वेळीही असे काही पाहायला मिळेल का? ऋतुराजच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी चांगली नसेल, तर संघ नवीन कर्णधाराचा शोध घेऊ शकतो.
चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार
महेंद्रसिंग धोनी: 235 सामने
रवींद्र जडेजा : 8 सामने
सुरेश रैना : 6 सामने