Ind Vs SA 3rd T20 Match: रिषभ पंत याच्या अडचणी वाढल्या; भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना ठरु शकतो अखेरचा

या टी-20 मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. हा सामना भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यासाठी अधिक महत्वाचा ठरणार आहे. सलग धावा करण्यास असमर्थ ठरलेल्या पंतला या सामन्यात फलंदाजीची ताकद दाखवावी लागेल, अन्यथा त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

रिषभ पंत (Photo by Robert Cianflone/Getty Images)

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका (Ind Vs SA) यांच्यात आज तिसरा टी-20 (3rd T20 Match) सामना रंगणार आहे . या टी-20 मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. हा सामना भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यासाठी अधिक महत्वाचा ठरणार आहे. सलग धावा करण्यास असमर्थ ठरलेल्या पंतला या सामन्यात फलंदाजीची ताकद दाखवावी लागेल, अन्यथा त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. विश्वकपात धीम्या गतीच्या फलंदाजी केल्यामुळे महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) जागेवर पंतला विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून संधी देण्यात आली होती. परंतु, पंत आतापर्यंत मर्यादित स्वरूपात सातत्याने धावा करण्यास अपयशी ठरला आहे. यामुळे पंतच्या फलंदाजीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे.

आज भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना बंगळरु (Bengalaru) येथील एम. चिन्नास्वामी मैदानात (M Chinnaswamy Stadium) होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे पारडे जड असले तरी, रिषभ पंत यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय निवड समितीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे पंत निराशाजनक कामगिरी करत आहे, तर दुसरीकडे संजू सॅमसन आणि इशान किशन घरगुती क्रिकेटसाठी चमकदार खेळी करत आहेत. या सामन्यात रिषभ पंत यांच्याकडून अधिक अपेक्षा केली जात आहे. या सामन्यात त्याने चांगले प्रदर्शन केले नाहीतर, त्याला संघातून बाहेर पडावे लागणार असा अंदाज वर्तवला जात आहे. पंतच्या जागेवर संजू सॅमसन किंवा इशान किशनला संधी देण्यात येईल का? याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा-एमएस धोनी याचा टाइम ओव्हर, 2020 टी-20 विश्वचषकसाठी सुनील गावस्कर यांची 'या' खेळाडूला पहिली पसंती

रिषभ पंतचे अंतिम 10 सामन्यांतील प्रदर्शन

रिषभ पंतने अंतिम 10 टी-20 सामन्यात केवळ 2 सामने सोडले तर, 10 पेक्षा कमी धावा केल्या आहेत. अंतिम 10 सामन्यांवर नजर टाकल्यास त्याने अनुक्रमे 0, 4, 40, 28, 3, 1, 0, 4, 65 आणि 4 धावा केल्या आहेत. म्हणजे केवळ दोनवेळा तो 30 पेक्षा जास्त धावा करण्यास सक्षम ठरला आहे.

भारताचा कर्णधार कोहली आणि रिषभ पंत यांच्या खेळीवर प्रशिक्षक आणि संघ निवडक समितीने नाराजी व्यक्त केली आहे. निवडक समितीची मुख्य एमएसके प्रसाद हे अलीकडेच म्हणाले होती की, रिषभ पंत याला तीन्ही स्वरुपातील क्रिकेटसाठी तयार केले जात आहे. मात्र, रिषभ पंतला संघात टिकण्यासाठी उत्तम कामगिरी करुन दाखवावी लागेल.