IPL 2022: ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रविण अमरेंना दंड, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

पंतशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे (Pravin Amare) यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. या वादाच्या वेळी अमरे हे मैदानात गेले होते. त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यानां मॅच फीच्या 100 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे.

ऋषभ पंत (Photo Credit: Twitter)

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Panth) याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात नो-बॉलसाठी पंचांविरुद्ध नाराजी व्यक्त करून सामन्यात अडथळा आणल्याचा फटका बसला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पंतला मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला आहे. म्हणजेच त्याची संपूर्ण मॅच फी कापण्यात आली आहे. पंतशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे (Pravin Amare) यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. या वादाच्या वेळी अमरे हे मैदानात गेले होते. त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यानां मॅच फीच्या 100 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे.

शार्दुल ठाकूरला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. पंतने आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत कलम 2.7च्या लेव्हल 2 चे उल्लंघन केल्याचा आरोप मान्य केला आहे. सामन्यात ऋषभ पंतला पाठिंबा दिल्याबद्दल शार्दुलला कलम 2.8 च्या लेव्हल 2 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. ठाकूर यांनीही त्यांची शिक्षा मान्य केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या षटकात 36 धावांची गरज होती. पॉवेलने ओबेड मॅकॉयच्या पहिल्या तीन चेंडूंवर षटकार ठोकला. अशाप्रकारे दिल्लीला शेवटच्या तीन चेंडूत 18 धावांची गरज होती. अशा स्थितीत नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या कुलदीपने अंपायरकडे बोट दाखवून शेवटच्या चेंडूचा रिप्ले पाहण्यास सांगितले कारण तो कमरेच्या वर असता तर तो नो-बॉल होऊ शकला असता. पॉवेलनेही पंचांशी बोलण्यास सुरुवात केली पण मैदानावरील पंचांनी चेंडू वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर पंतने पॉवेल आणि कुलदीपला परतण्यास सांगितले. दरम्यान, सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने त्याच्याशी संवाद साधला. (हे देखील वाचा: IPL 2022 Purple Cap Updated List: पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘Kul-Cha’ जोडीचा दबदबा, पहा संपूर्ण लिस्ट)

या घटनेदरम्यान दिल्लीच्या कोचिंग स्टाफचा सदस्य प्रवीण अमरेही मैदानात आला, मात्र पंचांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. राजस्थानचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने कुलदीपला बाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. राजस्थानचा सलामीवीर आणि सामन्यात 116 धावा करणारा जोस बटलरही पंतशी सीमारेषेजवळ वाद घालताना दिसला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement