RCB vs KXIP, IPL 2020: क्रिस मॉरिसच्या फटकेबाजीने आरसीबीची 171 धावांपर्यंत मजल, किंग्स इलेव्हन पंजाबला विजयासाठी 172 धावांचे आव्हान

अशास्थतीत आरसीबीने 6 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या आणि पंजाबसमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य ठेवले. आरसीबीकडून क्रिस मॉरिसने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये काही मोठे फटके मारले आणि आरसीबीला 171 धावांपर्यंत मजल मारून दिली.

किंग्ज इलेव्हन पंजाब (Photo Credit: Twitter/IPL)

RCB vs KXIP, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 31व्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली. अशास्थतीत आरसीबीने (RCB) 6 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या आणि पंजाबसमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य ठेवले. पंजाबने आजवर खेळलेल्या 7 पैकी फक्त 1 सामना जिंकला असून 6 संनयात त्यांचा पराभव झाला आहे. पहिले फलंदाजी करणाऱ्या आरसीबीकडून आज कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) दोन धावांनी अर्धशतक हुकले आणि 48 धावा केल्या. शिवम दुबेने 23 आणि आरोन फिंचने 20 धावांचे योगदान दिले. विशेषतः विराटसाठी आजचा सामना महत्वपूर्ण आहे. किंग्स इलेव्हनविरुद्ध आजचा सामना विराटचा आरसीबीकडून 200वा टी-20 सामना आहे. दुसरीकडे, आजच्या सामन्यात किंग्स इलेव्हनसाठी मुरुगन अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी सर्वाधिक प्रत्येकी 2 अर्शदीप सिंह आणि क्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. (RCB vs KXIP, IPL 2020: विराट कोहलीने पार केलं अनोखं दुहेरी शतक, एका संघाकडून 200 टी-20 मॅच खेळणारा जगातील पहिला खेळाडू)

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आरसीबीकडून फिंच आणि देवदत्त पडिक्कल सलामीला आले. दोघांनी 4 षटकांत 38 धावा केल्या, पण पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर देवदत्त 12 चेंडूत 18 धावांवर बाद झाला. त्यांनतर मुरुगन अश्विनने 20 धावा करून खेळणाऱ्या फिंचला बोल्ड केले. तिसरा धक्का आरसीबीला वॉशिंग्टन सुंदरच्या रूपात बसला जो 13 धावा करून जॉर्डनकडे झेलबाद झाला. शिवम दुबे 19 चेंडूत 23 धावा फटकावून जॉर्डनचा शिकार बनला. मागील सामन्यात आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरलेला एबी डिव्हिलियर्सने 2 धावा केल्या आणि शमीच्या चेंडूवर दीपक हूडाकडे झेलबाद झाला. डिव्हिलिअर्स पाठोपाठ विराट देखील 39 चेंडूत 3 चौकारात 48 धावा करून बाद झाला. क्रिस मॉरिसने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये काही मोठे फटके मारले आणि आरसीबीला 171 धावांपर्यंत मजल मारून दिली. मॉरिसने 1 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने नाबाद 25 आणि ईसूरु उदानाने 5 चेंडूत एका षटकारासह नाबाद 10 धावा केल्या. शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये तीन धावा आणि 1 चौकारांसह 24 धावांची लूटवल्या.

या सामन्यासाठी आरसीबीने संघात कोणताही बदल केलेला नाही, तर किंग्ज इलेव्हन पंजाबने तीन बदल केले. मनदीप सिंह प्रभसिमरन सिंह आणि मुजीब उर रहमान यांना पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले असून त्यांच्या जागी क्रिस गेल, दीपक हुडा आणि मुरुगन अश्विन यांना संधी मिळाली आहे.