RCB vs KKR IPL 2021: विजयासह ‘विराटसेने’ने साधली पहिली आयपीएल हॅटट्रिक, नाईट रायडर्स विरोधात 38 धावांनी मारली बाजी

विशेष म्हणजे ‘विराटसेने’ने आयपीएलमध्ये पहिल्यांदा सलग तीन सामने जिंकले आहेत. बेंगलोरने पहिले फलंदाजी करत केकेआरला 205 धावांचं विशाल लक्ष्य दिलं. प्रत्युत्तरात नाईट रायडर्स 8 विकेट गमावून 166 धावाच करू शकले

विराट कोहली (Photo Credit: PTI)

RCB vs KKR IPL 2021: आयपीएल (IPL) 14 च्या दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 38 धावांनी मात केली आणि मोसमात विजयाचं हॅटट्रिक साजरं केलं. विशेष म्हणजे ‘विराटसेने’ने आयपीएलमध्ये पहिल्यांदा सलग तीन सामने जिंकले आहेत. बेंगलोरने पहिले फलंदाजी करत केकेआरला 205 धावांचं विशाल लक्ष्य दिलं ज्याच्या प्रत्युत्तरात नाईट रायडर्स 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 166 धावाच करू शकले ज्यामुळे संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जाऊ लागले. कोलकाताकडून आंद्रे रसेल (Andre Russell) 31 धावा केल्या तर हरभजन सिंह धावा आणि वरुण चक्रवर्ती धावा करून नाबाद परतले तर आरसीबीच्या विजयात फलंदाजांनंतर गोलंदाजही चमकले. काईल जेमीसन (Kyle Jamieson) सर्वाधिक 3 तर युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या तर वॉशिंग्टन सुंदरने 1 गडी बाद केला. (IPL 2021: आयपीएल दे दणादण! Kieron Pollard ने ठोकला 14व्या मोसमातला सर्वात उत्तुंग षटकार, पहा टॉप-5 लांब सिक्स)

205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघाला शुभमन गिलच्या रूपात पहिला झटका बसला. गिलने 9 चेंडूत 21 धावा केल्या. त्यानंतर, राहुल त्रिपाठी 24 चेंडूंत 25 धावांवर तंबूत परतला. नितीश राणा 18 धावा करून चहलच्या पहिल्या चेंडूवर देवदत्त पडिक्क्लकडे झेलबाद झाला. यानंतर संघाला दिनेश कार्तिकच्या रुपात चौथा धक्का बसला. चहलने कार्तिकला एलबीडब्ल्यू आऊट केले. कर्णधार इऑन मॉर्गनला पटेलने 29 धावांवर कर्णधार विराटकडे कॅच आऊट केले. आजच्या सामन्यात रसेलने पुन्हा अपेक्षा भंग केली. आंद्रे रसेल आक्रमक फलंदाजी करत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला मात्र, वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज मोठे फटके खेळण्यात अपयशी ठरला. शुबमन गिल 21 धावा, राहुल त्रिपाठी 25 धावा, नितीश राणा 18 धावा, तर दिनेश कार्तिक केवळ 2 धावा करुन तंबूत परतले.

यापूर्वी, बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने सलग दुसरे अर्धशतक ठोकले व सर्वाधिक 78 धावा चोपल्या, तर एबी डिव्हिलियर्सने नाबाद 76 धावांची खेळी केली ज्यामुळे संघाने दोनशे पार धावसंख्या गाठली. मॅक्सवेलने आपल्या 48 चेंडूच्या तुफानी खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले. आरसीबीकडून कर्णधार विराट कोहली आणि रजत पाटिदार झटपट बाद झाले, पण मॅक्सवेलने आपला आक्रमक खेळ सुरु ठेवला आणि कोलकाता गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.