RCB vs KKR, IPL 2020: शारजाह येथे विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सने उभारला धावांचा डोंगर, नाईट रायडर्स समोर विजयासाठी 195 धावांचे आव्हान

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यातील आजच्या आयपीएल सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थतीत रॉयल चॅलेंजर्सने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 194 धावा केल्या

विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: PTI)

RCB vs KKR, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील आजच्या आयपीएल (IPL) सामन्यात आरसीबी (RCB) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्सने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 194 धावा केल्या आणि नाईट रायडर्स समोर 195 धावांचे लक्ष्य ठेवले. पहिले फलंदाजी करत आरसीबीची सुरुवात चांगली झाली. सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कलने 32, आरोन फिंच 47 तर विराट कोहली 33आणि एबी डिव्हिलिअर्स 73 धावा करून नाबाद परतले. विराट आणि डिव्हिलिअर्सने पुन्हा एकदा अर्धशतकी भागीदारी करून टीमला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. कोहलीने शारजाहची खेळपट्टी पाहून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय देवदत्त आणि फिंचने योग्य सिद्ध केला. दुसरीकडे, नाईट रायडर्सकडून गोलंदाजनांना फक्त विकेट घेतण्यात यश मिळाले. प्रसिद्ध कृष्णा आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मॅचपूर्वी मुंबई इंडियन्सने केलेल्या ट्विटने वादाला सुरुवात, फिक्सिंगच्या चर्चांना उधाण, पाहा Post)

आरसीबीसाठी दोघांनी केकेआर गोलंदाजांविरूद्ध वेगवान धावा केल्या. यानंतर डिव्हिलियर्सने स्फोटक डाव खेळला आणि दुसऱ्या टोकाकडून त्याला विराटचा चांगला पाठिंबा मिळाला. या दरम्यान, विराट आणि डि व्हिलिअर्सच्या भागीदारीने आयपीएलमध्ये 3000 धावांचा टप्पा देखील गाठला. एबी डिव्हिलियर्सने आज 33 चेंडूत नाबाद 73 धावांची सर्वाधिक अर्धशतकी खेळी खेळली.डिव्हिलियर्सने त्याच्या शानदार खेळीत चार चौकार आणि पाच गगनचुंबी षटकार लगावले. आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिंच आणि भारतीय युवा फलंदाज पडिक्कलने डाव सुरू केला.

दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 7.4 ओव्हरमध्ये 67 धावांची भागीदारी केली, पण देवदत्त मोठा शॉट खेळण्याच्या प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर बोल्ड झाला. देवदत्तने आज 32 चेंडूंचा सामना केला आणि चार चौकार व एका षटकाराच्या मदतीने 32 धावा केल्या.याशिवाय फिंचने 37 चेंडूंत 4 चौकार आणि एका षटकारासह 47 धावा फटकावल्या. दुसरीकडे, कर्णधार विराट कोहलीने एका चौकारच्या मदतीने 28 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. दोन्ही संघ विजयाच्या रथावर स्वार आहेत, त्यामुळे आजची स्पर्धा रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement