RCB vs DC, IPL 2020 Toss Updates: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
दरम्यान, बंगळरूच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाच्या निर्णय घेतला आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Royal Challengers Bangalore Vs Delhi Capitals) संघ आमने-सामने येणार आहेत. दरम्यान, बंगळरूच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाच्या निर्णय घेतला आहे. आज भारतीय संघातील दोन युवा खेळाडू आपपल्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. आयपीएल स्पर्धेत भारताचा क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बंगळरु संघाचे नेतृत्व करत आहे. तर, श्रेयस अय्यर दिल्ली कर्णधार पद संभाळत आहे. या हंगामात दोन्ही संघांनी 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु, रनरेट जोरावर आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या आणि बंगळरुचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर रॉयल चॅलेंजर्स बंगळरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- Bhuvneshwar Kumar Ruled Out of IPL 2020: सनरायझर्स हैदराबादच्या संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार याची स्पर्धेतून माघार
रॉयल चॅलेंजर्स बंगळरू:
आरोन फिंच, देवदत्त पद्धिकल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत मान, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, ऍडम झंपा, इसरू उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
दिल्लीची कॅपिटल्स:
श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, केमो पॉल, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत, संदीप लामिछाने, शिखर धवन, जेसन रॉय , समृद्ध नॉर्टजे, अॅलेक्स कॅरी, शिमरॉन हेटमीयर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टोईनिस आणि ललित यादव.