IPL Auction 2025 Live

RCB vs CSK IPL 2021: धोनी ब्रिगेड विरोधात 152 KMPH च्या वेगाने चेंडू फेकणाऱ्या गोलंदाजाला विराट कोहली उतरवणार मैदानात?

विराट कोहली चेन्नईविरुद्ध खेळणाऱ्या 11 मध्ये बदल करू शकतो. विराट आयपीएलचा वेगवान भारतीय गोलंदाज नवदीप सैनीला संधी देऊ शकतो. त्याने IPL 2019 मध्ये 152.85 kmph च्या वेगाने चेंडू टाकला.

RCB vs CSK IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 चा 35 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात शारजाह (Sharjah) येथे खेळला जाईल. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात विराट कोहलीची टीम आरसीबी (RCB) कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाली. अशा स्थितीत संघ युएईमध्ये आपल्या पहिल्या विजयच्या शोधात आहेत. आरसीबी सध्या आयपीएल  (IPL) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत मजबूत राहण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. कोलकाताविरुद्ध शेवटच्या सामन्यात फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजांनीही अत्यंत खराब कामगिरी केली. अशा स्थितीत विराट चेन्नईविरुद्ध खेळणाऱ्या 11 मध्ये बदल करू शकतो. युएईच्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांची खूप मदत होत आहे. त्यामुळे विराट आयपीएलचा वेगवान भारतीय गोलंदाज नवदीप सैनीला (Navdeep Saini) संधी देऊ शकतो. (RCB vs CSK IPL 2021 Predicted Playing XI: आकडे देतात धोनीची साथ, विराटला करावा लागणार पलटवार; पाहा चेन्नई व बेंगलोरचा संभावित प्लेइंग इलेव्हन)

28 वर्षीय सैनी वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएल 2019 आणि 2020 मध्ये सैनी हा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला होता. त्याने IPL 2019 मध्ये 152.85 kmph च्या वेगाने चेंडू टाकला. आयपीएलमध्ये सैनीची कामगिरी फारशी चांगली राहिली नसली तरी त्याने 27 आयपीएल सामन्यांमध्ये फक्त 17 विकेट्स घेतल्या आहेत. अलीकडेच श्रीलंका दौऱ्यावर सैनीला एक वनडे आणि एक टी-20 सामना खेळण्याची संधी मिळाली पण तो विकेट घेण्यात अपयशी ठरला. असे असूनही, सैनी फलंदाजांना त्याच्या वेगाने आणि यूएईच्या खेळपट्ट्यांवर चेंडूला उसळी मारून अडचणीत आणू शकतो. तसेच, टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये सैनीचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. त्याने 10 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या सध्याच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा हर्षल पटेल सध्या लयीत दिसत नाही. अशा स्थितीत धोनी ब्रिगेड विरोधात वेगवान सैनी, जो चेंडूला स्विंग देखील करू शकतो, एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो.

दुसरीकडे, एमएस चेन्नई सुपर किंग्स आरसीबीविरुद्ध विजय मिळवून गुणतालिकेत नंबर एकवर झेप घेण्याच्या निर्धारित असेल. दिल्ली कॅपिटल्स सध्या पॉईंट टेबलवर आघाडीवर असून चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहेत. हे दोन्ही संघ प्लेऑफ फेरीत प्रवेश करण्याचे प्रबळ दावेदार आहेत. तसेच आरसीबी तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. त्यामुळे आजच्या सामन्याच्या निकालावर सर्वांचे लक्ष असेल.