RCB vs CSK, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल 2020) 13व्या सत्राचा 44वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार आज, 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 3 वाजता टॉस होणार असून सामना 3.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: File Image)

RCB vs CSK, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्राचा 44वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात खेळला जाणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची सीएसके संघाच्या आशा संपुष्टात आल्या असल्या तरी कर्णधार धोनी म्हणाला की तो स्पर्धेच्या उर्वरित सामन्यात विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आरसीबी (RCB) आणि सीएसके (CSK) यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार आज, 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 3 वाजता टॉस होणार असून सामना 3.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: पंजाबने हैदराबादवर मिळवला दणदणीत विजय, SRHला 12 धावांनी पराभूत करत KXIPच्या प्ले ऑफच्या आशा कायम)

आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या 11 पैकी आठ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर सीएसकेसमोर स्पर्धेमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. सीएसकेचे 11 सामन्यांतून सहा गुण आहेत आणि संघ तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकू शकतो प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो. यासाठी अन्य संघांचे निकालही त्यानुसार असायला हवेत. दुसरीकडे, सीएसकेविरुद्ध विजय मिळवून कोहलीची आरसीबी प्ले ऑफ गाठणारी पहिली टीम ठरू शकते. बेंगलोर 14 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पाहा आरसीबी आणि सीएसके संघ

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, आरोन फिंच, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन, इसुरु उदाना, जोशुआ फिलिप, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, अ‍ॅडम झांपा.

चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), मुरली विजय, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, रुतुराज गायकवाड, केदार जाधव, रविंद्र जडेजा, पियुष चावला, मिशेल सॅटनर, मोनू कुमार, सॅम कुरन, एन जगदीशन, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, जोश हेजलवुड, आर साई किशोर.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now