IPL 2023: रवी शास्त्रीं यांनी केली मोठी भविष्यवाणी, सांगितले आयपीएल 2023 च्या विजेत्या संघाचे नाव

गेल्या मोसमात जे दोन संघ अंतिम फेरीत खेळले होते, ते दोन्ही संघ यावेळीही जबरदस्त कामगिरी करत प्लेऑफच्या शर्यतीत पुढे जात आहेत.

Ravi Shastri (Photo Credit - Twitter)

क्रिकेटच्या महायुद्धात, आयपीएलमध्ये चाहत्यांना दररोज सर्वच संघांची शानदार खेळी पाहायला मिळते. मागील हंगामाप्रमाणे या मोसमातही गुजरात टायटनची मोहिनी चाहत्यांवर कायम आहे. गेल्या मोसमात जे दोन संघ अंतिम फेरीत खेळले होते, ते दोन्ही संघ यावेळीही जबरदस्त कामगिरी करत प्लेऑफच्या शर्यतीत पुढे जात आहेत. प्लेऑफमध्ये कोणता संघ खेळतोय आणि कोणता नाही हे सांगता येत नसले तरी, दरम्यान, भारतीय संघाच्या माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांबाबत वक्तव्य केले आहे. (हे देखील वाचा: RR vs GT, IPL 2023: बटलरने चौकार मारल्याने हार्दिक पांड्या झाला अवाक, थेट सामन्यात डोळे दाखवून दिली धमकी (Watch Video)

यावेळी गुजरात आयपीएल ट्रॉफी उचलेल- रवी शास्त्री

आयपीएल 2022 मध्ये, गुजरात टायटन्सने प्रथमच आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली, त्यांनी पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. या मोसमातही गुजरातने चांगली कामगिरी करत आहे. आता टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “सध्याचा फॉर्म आणि संघातील खेळाडूंची कामगिरी पाहता मला विश्वास आहे की गुजरात या हंगामात ट्रॉफी जिंकू शकेल. या संघात सातत्य आणि लवचिकता आहे. त्याचबरोबर सात-आठ खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.

रवी शास्त्री यांनीही संजू सॅमसनबाबत केले होते वक्तव्य 

काल रवी शास्त्री यांनी अनेक खेळाडूंचे कौतुक केले होते. त्यांनी संजूबाबतही वक्तव्य केले आहे. रवी शास्त्री यांनी संजूचे कौतुक करत त्याला चांगल्या कर्णधारांच्या श्रेणीत टाकले आहे. संजूबद्दल बोलताना ते म्हणाले- “संजू सॅमसन कर्णधार म्हणून परिपक्व झाला आहे. तो त्याच्या फिरकीपटूंचा चांगला वापर करतो. एक चांगला कर्णधारच तीन फिरकीपटूंसोबत खेळू शकतो आणि त्यांचा हुशारीने वापर करू शकतो.