IND vs ZIM: पहिल्या वनडेत राहुल त्रिपाठी करू शकतो पदार्पण, टीम इंडियाची अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

त्रिपाठीशिवाय संघाचा कर्णधार केएल राहुलही दीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करत आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

18 ऑगस्टपासून म्हणजे आज झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेद्वारे केएल राहुल (KL Rahul) दीर्घ कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत आहे. राहुल दीर्घकाळानंतर संघात पुनरागमन करत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर तो संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. त्याचबरोबर या सामन्यात राहुल त्रिपाठीही (Rahul Tripathi) भारतासाठी वनडे पदार्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्रिपाठीशिवाय संघाचा कर्णधार केएल राहुलही दीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करत आहे. या सामन्यात तो शिखर धवनसोबत (Shikhar Dhawan) ओपनिंग करताना दिसणार आहे. त्याचवेळी राहुलच्या पहिल्या ओपनिंगची जबाबदारी स्वीकारणारा शुभमन गिल (Shubman Gill) मधल्या फळीत संघाची धुरा सांभाळताना दिसेेल.

शाहबाज अहमदही संघात झाला सामील 

झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताने वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदचा संघात समावेश केला आहे. दुखापतीमुळे सुंदर या मालिकेतून बाहेर पडला आहे. शाहबाजने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा एक भाग आहे. तो प्रथमच भारतीय संघात सामील झाला आहे. (हे देखील वाचा: माजी स्टार क्रिकेटर Vinod Kambli वर कोसळले आर्थिक संकट; BCCI च्या पेन्शनवर होत आहे कुटुंबाचे पालन पोषण, नोकरीच्या शोधात)

अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, संजू सॅमसन/इशान किशन (WK), दीपक हुडा, अक्षर पटेल, दीपक चहर, कुलदीप यादव, प्रसिध्द कृष्णा, मोहम्मद सिराज