Rahmanullah Gurbaz New Record: रहमानउल्ला गुरबाजची ऐतिहासिक कामगिरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकून अनेक विक्रमांना घातली गवसणी
या सामन्यात गुरबाजने 110 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 105 धावा केल्या. त्याच्यामुळेच अफगाणिस्तान क्रिकेट संघाला 311 धावांची मोठी धावसंख्या उभारता आली.
AFG vs SA 2nd ODI 2024: अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. अफगाणिस्तानने हा सामना 177 धावांनी जिंकला. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. 23 वर्षीय युवा फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने दमदार शतक (Rahmanullah Gurbaz Century) ठोकले. या सामन्यात गुरबाजने 110 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 105 धावा केल्या. त्याच्यामुळेच अफगाणिस्तान क्रिकेट संघाला 311 धावांची मोठी धावसंख्या उभारता आली. (हे देखील वाचा: Afghanistan vs South Africa 2nd ODI 2024 Highlights: अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्याचे एका क्लिकवर येथे पाहा हायलाइट्स)
रहमानउल्ला गुरबाजने केला मोठा पराक्रम
रहमानउल्ला गुरबाजने आतापर्यंत केवळ 42 एकदिवसीय डाव खेळले असले तरी त्याच्या कारकिर्दीतील 7 वे शतक झळकावले आहे. 42 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 शतके करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी कोणीही हे करू शकले नाही. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे फलंदाजही हे करू शकले नाहीत.
विराट कोहलीची केली बरोबरी
आम्ही तुम्हाला सांगूया की वयाच्या 23 वर्षापूर्वी कोहलीने 7 शतके आणि बाबरने एकदिवसीय सामन्यात 6 शतके झळकावली होती. आता या बाबतीत गुरबाजने बाबर आझमला मागे टाकले असून कोहलीची बरोबरी केली आहे. वयाच्या 23 वर्षापूर्वी गुरबाजने वनडेमध्ये 7 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर वयाच्या 23 वर्षापूर्वी वनडेमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम महान सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने वयाची 23 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी वनडेत 8 शतके झळकावली होती.
वयाच्या 23 व्या वर्षी सर्वाधिक एकदिवसीय शतक झळकवणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर- 8
क्विंटन डी कॉक -7
रहमानउल्ला गुरबाज*- 7
विराट कोहली -7
बाबर आझम-6
उपुल थरंगा-6
अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके
रहमानउल्ला गुरबाज अफगाणिस्तान संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने मोहम्मद शहजादचा विक्रम मोडला आहे. त्याच्या नावावर 6 वनडे शतके आहेत. गुरबाजने त्याच्या कारकिर्दीतील 7 वे वनडे शतक झळकावले आहे.
अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे फलंदाज
रहमानउल्ला गुरबाज- 7 शतके
मोहम्मद शहजाद- 6 शतके
इब्राहिम झद्रान - 5 शतके
रहमत शाह- 5 शतके
अफगाणिस्तानने 300 हून अधिक धावा केल्या
आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने सामन्यात 311 धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाजने सामन्यात शतक झळकावले, तर अजमातुल्ला उमरझाई (86 धावा) आणि रहमत शाह (50 धावा) यांनी अर्धशतके झळकावली. या खेळाडूंमुळेच अफगाणिस्तान संघ डोंगराएवढी मोठी धावसंख्या उभारू शकला आहे. अफगाणिस्तान संघाने आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 6 गडी राखून जिंकला.