India vs Australia: पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलिया टेस्ट दौऱ्यामधून बाहेर, मयंक अग्रवाल याला भारतीय संघामध्ये स्थान
भारतीय टेस्ट संघातील युवा ओपनिंग गोलंदाजपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ह्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे.
India vs Australia: भारतीय टेस्ट संघातील युवा ओपनिंग गोलंदाजपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ह्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे. तर शॉच्या जागी कर्नाटकातील गोलंदाज मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) ह्याला संघात स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्री यांनी पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्सिंग डे टेस्टपर्यंत बरा होऊ शकतो असे सांगितले होते. अद्याप शॉची दुखापत बरी झाली नसल्याने त्याला आराम करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा क्रिकेटचा तिसरा सामना बॉक्सिंग डे टेस्ट 26 ते 30 डिसेंबर रोजी मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. तसेच ऑलराऊंडर म्हणून ओळख असलेला खेळाडू हार्दिक पांड्या हा सुद्धा आजारपणातून बरा झाला असून तो या सामन्यामध्ये खेळताना दिसून येणार आहे. पृथ्वी शॉला सिडनी येथे खेळवल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या क्रिकेट सामन्यामध्ये गुडघ्याला दुखापत झाली होती.
यापूर्वी मयंक अग्रवाल ह्याला वेस्ट इंडिजच्या विरुद्धच्या क्रिकेट सामन्यात खेळवले गेले होते. मात्र मयंकला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे सध्या चालू असलेल्या टेस्ट सिरिजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.