Pravin Dubey Quick Facts: दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याच्या जागी प्रविण दुबे याला संधी; किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सामन्यात करणार आयपीएलमध्ये पदार्पण
मात्र, दिल्ली कॅपिटल्स आणि खेळाडूंच्या दुखापती हे यंदाच्या आयपीएल हंगामातील समीकरण होत चालले आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघाने उत्कृष्ट कामिगिरी करून दाखवली आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्स आणि खेळाडूंच्या दुखापती हे यंदाच्या आयपीएल हंगामातील समीकरण होत चालले आहे. आधी रविचंद्रन अश्विन मग इशांत शर्मा, अमित मिश्रा आणि सध्या ऋषभ पंत हे सगळेच दुखापतीच्या तक्रारीने ग्रस्त आहेत. अश्विनने दुखपातीतून सावरून पुनरागमन केले आहे. पंतदेखील लवकरत कमबॅकच्या तयारीत आहे. परंतु, दुखपातीमुळे इशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. यामुळे अमित मिश्राच्या जागी संघाने प्रविण दुबे (Pravin Dubey) याची निवड केली आहे. तसेच दिल्लीच्या येत्या पुढील सामन्यात तो संघाकडून खेळताना दिसणार आहे.
प्रवीण दुबेने कर्नाटक प्रीमियर लीगच्या 2015-16 च्या हंगामात 8 विकेट्स पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सैयद मुश्ताक अली टी-20 विश्वचषक स्पर्धेतही त्याने 15 विकेट्स घेऊन उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. प्रवीण दुबे अद्याप आयपीएलचा एकही सामना खेळलेला नाही. मात्र, त्याच्यासाठी आयपीएल हे काही नवीन नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने 2016 मध्ये त्याला खरेदी केले होते. मात्र, संघाकडून त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर 2017 मध्येही तो बेंगलोरच्या संघाचा सदस्य होता. त्यानंतर त्याला करारमुक्त करण्यात आले. हे देखील वाचा- How to Download Hotstar & Watch CSK Vs RR Live Match: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
ट्विट-
आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ सध्या 7 विजयांसह 14 गुणांवर आहे. दिल्लीने जवळपास आपली प्ले-ऑफ्सची जागा पक्की केली आहे. त्यामुळे दिल्ली व्यवस्थापन उवर्रित सामन्यात आपले उरलेले खेळाडू मैदानात उतरवून त्यांची प्रतिभा तपासत आहे. याचा फायदा प्रविण दुबेला होऊ शकतो.