How to Download Hotstar & Watch CSK Vs RR Live Match: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
RR Vs CSK (Photo Credit: File Photo)

CSK Vs RR 37th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 30व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ (Channai Super Kings Vs Rajasthan Royals) आज एकमेकांशी भिडणार आहेत. शेख जायद स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. चेन्नईच्या संघाचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी करत आहेत. तर, राजस्थान संघाचे कर्णधार पद स्टीव्ह स्मिथ संभाळत आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ सातव्या तर, राजस्थानचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- CSK Vs RR, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-

- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.