'मॅच फिक्सिंगमध्ये सामील असलेला मी पहिला किंवा शेवटचा क्रिकेटपटू नाही', पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद असिफ ने PCB वर लगावले गंभीर आरोप
आसिफ म्हणाला की स्पॉट फिक्सिंग करणारा तो पहिला क्रिकेटपटू किंवा शेवटचा खेळाडू नव्हता. 2010 पाकिस्तानच्या इंग्लंड दौर्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील भूमिकेसाठी आसिफवर सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद असिफ (Mohammad Asif ) याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) त्याला दुसरी संधी न दिल्याचा आरोप केला आहे. आसिफ म्हणाला की स्पॉट फिक्सिंग (Spot-Fixing) करणारा तो पहिला क्रिकेटपटू किंवा शेवटचा खेळाडू नव्हता. मंडळाने इतर खेळाडूंना दुसरी संधी दिली अशा परिस्थितीत त्याच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने त्याच्याशी अधिक चांगले वागले पाहिजे होते. 2010 पाकिस्तानच्या इंग्लंड दौर्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील भूमिकेसाठी आसिफवर सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या दौऱ्यावर असिफने पैशासाठी मुद्दाम नो बॉल टाकले होते. मोहम्मद अमीर आणि सलमान बट यांच्यासह दोषी आढळल्यानंतर त्याने तुरुंगवासही भोगला. आसिफ म्हणाला की, इतर अनेकांसारखीच मलाही दुसरी संधी मिळायला हवी होती, ज्यांचे नाव त्याने घेतले नाही. "प्रत्येकजण चुका करतो आणि मीसुद्धा केले. माझ्या आधी आणि माझ्या नंतरही खेळाडू फिक्सिंगमध्ये गुंतले होते. पण माझ्या आधीचे लोक पीसीबीमध्ये काम करत आहेत आणि माझ्या नंतरचे खेळतही आहेत," असे आसिफने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले. (पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाने केला मोठा खुलासा; 2009 मध्ये कर्णधाराविरुद्ध 'कट' रचत जाणीवपूर्वक गमावली वनडे मालिका, वाचा सविस्तर)
आसिफने पाकिस्तानकडून 23 टेस्ट, 38 वनडे आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आपल्या मर्यादित कारकीर्दीत त्याने केलेल्या कामगिरीबद्दल मला स्वत:चा अभिमान आहे, असेही असिफने म्हटले. असिफने म्हटले की, “प्रत्येकाला दुसरी संधी देण्यात आली होती आणि असे काही लोकं आहेत ज्यांना अशा रीतीने वागणूक दिली गेली नाही. मी जगातील अत्यंत आदर करणारा गोलंदाज आहे याकडे दुर्लक्ष करून पीसीबीने कधीही मला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. पण तरीही मी भूतकाळाबद्दल माहिती घेण्यास बसत नाही.”
2006 मध्येही डोप टेस्टमध्ये नापास झालेल्या आणि त्याला एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलेल्या 37 वर्षीय असिफने कबूल केले की त्याने मैदानाबाहेर चांगले वागले पाहिजे होते.” आसिफने म्हटले आहे की मी लहान कारकीर्दीत जगाला हादरवून टाकले होते. हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. आजही बऱ्याच वर्षांनंतर जगातील सर्वोत्तम फलंदाज माझी आठवत काढतात आणि ते माझ्याबद्दल बोलतात."