PBKS Vs RR IPL 2021 Match 32 Live Streaming: पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात रंगणार सामना, Star Sports Network वर पाहता येणार लाईव्ह प्रक्षेपण

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 32व्या सामन्यात आज (21 सप्टेंबर) पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आज आमने-सामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे.

PBKS Vs RR IPL 2021 Match 32 Live Streaming: पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात रंगणार सामना, Star Sports Network वर पाहता येणार लाईव्ह प्रक्षेपण
किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 32व्या सामन्यात आज (21 सप्टेंबर) पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आज आमने-सामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. पंजाबच्या संघाचे नेतृत्व केएल राहुल करीत आहे. तर, राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी संजू सॅमसन संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, सायंकाळी 7 वाजता टॉस होईल. तसेच 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पंजाब विरुद्ध राजस्थान यांच्यातील आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.

Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. पंजाब विरुद्ध राजस्थान यांच्यातील आयपीएलचा 32वा सामना लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकतात. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाईव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे देखील वाचा- IPL 2021: कोहलीच्या नावे होणार ‘विराट’ रेकॉर्ड, आयपीएलमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा बनणार RCB कर्णधार पहिलाच ‘द्विशतकवीर’

पंजाब किंग्ज संघ:

केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुडा, शाहरुख खान, रवी बिष्णोई, आदिल रशीद, मोहम्मद शमी, हरप्रीत ब्रार, एडन मार्कराम, नॅथन एलिस, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन , जलाज सक्सेना, मोईसेस हेन्रिक्स, प्रभसिमरन सिंग, मनदीप सिंग, मुरुगन अश्विन, सरफराज खान, फॅबियन एलन, सौरभ कुमार, उत्कर्ष सिंह, दर्शन नळकांडे, अर्शदीप सिंग

राजस्थान रॉयल्स संघ:

एविन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), रियान पराग, शिवम दुबे, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरिस, कार्तिक त्यागी, चेतन सकरीया, मुस्ताफिझूर रहमान, तबराईज शम्सी, श्रेयस गोपाल, लियाम लिव्हिंगस्टोन, जयदेव उनादकट, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, ग्लेन फिलिप्स, महिपाल लोमर, ओशाने थॉमस, मयंक मार्कंडे, अनुज रावत, जेराल्ड कोएत्झी, कुलदीप यादव, आकाश सिंह

(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2021 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).