PBKS vs CSK IPL 2021 Live Streaming: पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल सामना लाईव्ह कधी व कसा पाहणार? वाचा सविस्तर

पंजाब आणि चेन्नई संघातील आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: File Image)

PBKS vs CSK IPL 2021 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier Leagu) 14 व्या मोसमातील 8वा सामना आज पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात पुन्हा एकदा विकेटकीपर-कर्णधार आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघाची आयपीएलमध्ये यंदा विपरीत सुरुवात झाली आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) पंजाबने आपल्या पहिल्या सामन्यात रोमांचित विजय मिळवला तर एमएस धोनीच्या (MS Dhoni) सुपर किंग्सना आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघांमधील आयपीएलचा (IPL) 8वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणारा आजचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल तर टॉस अर्धातासपूर्वी, 7.00 वाजता होईल. पंजाब आणि चेन्नई संघातील आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. (IPL 2021: PBKS संघाविरुद्ध आजच्या आयपीएल सामन्यानंतर CSK कर्णधार MS Dhoni वर येऊ शकते बंदी, जाणून घ्या कारण)

आयपीएलमध्ये आजवर हे दोन्ही संघ एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले चेन्नई धोनीचा चेन्नई सह वरचढ राहिली आहे. चेन्नईने 14 सामन्यात पंजाबचा पराभव केला आहे, तर पंजाबने 9 सामन्यांमध्ये चेन्नईवर विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यातून एकीकडे सुपर किंग्स विजय पथावर परतण्यासाठी उत्सुक असतील तर पंजाबपुढे आपली चांगली कामगिरीचे सत्र सुरु ठेवण्याचे आव्हान असेल. शिवाय, सामन्यात राहुल आणि धोनीमध्ये कडू झुंज पाहायला मिळणार असेल. राहुलने मागील सामन्यात 50 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 91 धावांची खेळी केली तर धोनीला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे आजच्या सामन्यात या दोन्ही कर्णधारांवर कामगिरी करण्याची मोठी जबाबदारी असेल.

पहा पंजाब आणि चेन्नईची आयपीएल टीम

पंजाब किंग्सची टीम: केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, शाहरुख खान, झे रिचर्डसन, मुरुगन अश्विन, रिले मेरीडीथ, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, मोईसेस हेनरिक्स, मनदीप सिंह, क्रिस जॉर्डन, डेविड मालन, जलज सक्सेना, सरफराज खान, फॅबियन अ‍ॅलन, सौरभ कुमार, ईशान पोरेल, रवी बिश्नोई, उत्कर्ष सिंह, दर्शन नलकंडे, प्रभासीमरण सिंह आणि हरप्रीत ब्रार.

चेन्नई सुपर किंग्स: एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर) , इमरान ताहीर, लुंगी लिंगी एनजीडी, रुतूराज गायकवाड, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, एन जगदीशन, सुरेश रैना, मिचेल सँटनर, केएम आसिफ, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, फाफ डु प्लेसिस, ड्वेन ब्रावो, जोश हेझलवुड, सॅम कुरन, कर्ण शर्मा, रॉबिन उथप्‍पा, के गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा आणि सी हरि निशांत.