Pakistan Women vs New Zealand Women, 19th Match Pitch Report: दुबईच्या खेळपट्टीवर कोणाचे असणार वर्चस्व; फलंदाज की गोलंदाज ठरणार वरचढ? जाणून घ्या पिच रिपोर्ट

उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.

Photo Credit- X

Pakistan Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team 19th Match 2024 ICC Womens T20 World Cup Pitch Report: 2024 च्या आयसीसी (ICC) महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेतील (Womens T20 World Cup) 19 वा सामना आज पाकिस्तान महिला क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) महिला क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे.  उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टी 20 विश्वचषकात पाकिस्तान संघ आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. ज्यामध्ये एकात विजयाची नोंद झाली आहे. तर 2 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत, उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी, पाकिस्तान संघ न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत करण्याचा प्रयत्न करेल आणि टी 20 विश्वचषकात आपला दुसरा विजय नोंदवू इच्छिल. (हेही वाचा: 2024 ICC Women's T20 World Cup Points Table Update: ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर भारतीयांच्या नजरा आजच्या सामन्यावर; महिला टी 20 विश्वचषकातील गुणतालिका येथे पहा)

दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने टी 20 विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 मध्ये विजयाची नोंद झाली आहे. तर एकात पराभवाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी न्यूझीलंड संघाला पाकिस्तानविरुद्ध तिसरा विजय नोंदवायचा आहे.

दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी

पाकिस्तान महिला आणि न्यूझीलंड महिला संघ 11 वेळा टी 20 मध्ये खेळले आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत आहे. न्यूझीलंडने 9 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला केवळ 2 मध्ये विजय मिळाला नाही. अशा परिस्थितीत टी-20 मध्ये तिसरा विजय नोंदवण्याच्या इराद्याने पाकिस्तानचा संघ आज न्यूझीलंडविरुद्ध उतरणार आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडला 2-1 ने पराभूत करून आशिया आणि आयर्लंडबाहेर एकमेव मालिका विजय नोंदवला होता. या फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा हा त्यांचा एकमेव मालिका विजय होता.

खेळपट्टीचा अहवाल

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त ठरते. या खेळपट्टीवर, वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडू हलके स्विंग करू शकतात. त्यामुळे फलंदाजांना सुरुवातीला सावध राहावे लागेल. परंतु एकदा स्थिरावल्यानंतर खेळपट्टीवर मोठे फटके खेळणे सोपे होऊ शकते. संघांना पहिल्या डावात किमान 150 धावा कराव्या लागतील. दुसऱ्या डावात दव पडल्यास त्याचा परिणाम गोलंदाजांवर होऊ शकतो, त्यामुळे फलंदाजी सोपी होऊ शकते. नाणेफेक जिंकणारा संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.

हवामान परिस्थिती

दुबईतील हवामान दुपारच्या वेळी खूप उष्ण आणि सूर्यप्रकाशित असेल अशी अपेक्षा आहे. संध्याकाळी सामन्यादरम्यान हवामान उष्ण असेल, आकाश निरभ्र असेल. त्याशिवाय, पावसाची शक्यता नाही. तर अपेक्षित तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

दोन्ही संघांचे खेळाडू

पाकिस्तान महिला संघ: मुनिबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, सदफ शमास/इरम जावेद, निदा दार, आलिया रियाझ, फातिमा सना, ओमामा सोहेल, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू, सय्यदा अरुब शाह.

न्यूझीलंड महिला संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, इसाबेला गेज (विकेटकीपर), ली ताहुहू, लेह कास्परेक रोझमेरी मायर, ईडन कार्सन.