2024 ICC Women's T20 World Cup Points Table Update: ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर भारतीयांच्या नजरा आजच्या सामन्यावर; महिला टी 20 विश्वचषकातील गुणतालिका येथे पहा
ऑस्ट्रेलिया, टीम इंडिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. तर बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर भारताचे विश्वचषकातील भविष्य जळपास संपल्याची शक्यता आहे.
2024 ICC Women's T20 World Cup Points Table Update: युएईमध्ये महिला टी-20 वर्ल्ड कप 2024चा (Women's T20 World Cup 2024)थरार रंगला आहे. ज्यामध्ये काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia Women's Team) खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियाला (India) पराभव झाला. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 152 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाला 20 षटकात 9 विकेट्सवर केवळ 142 धावा करता आल्या आणि सामना 9 धावांनी गमवावा लागला. या पराभवानंतर आता भारतीय संघाला उपांत्य फेरी खेळणे जवळपास कठीण झाले आहे. (हेही वाचा:PAK W vs NZ W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: आजच्या सामन्यावर भारताच भवितव्य ठरणार; पाकिस्तान-न्यूझीलंड थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या )
कालच्या पराभवानंतर भारतीय संघ अजूनही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला नाही. टीम इंडियाच्या आशा आता पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून आहेत. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये जायचे असेल तर पाकिस्तानला न्यूझीलंड संघाचा पराभव करावा लागेल. याशिवाय भारताचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगला असायला हवा.
टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर भारतीय संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला. पण ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
महिला टी 20 विश्वचषक 2024 गुणतालिका
गट अ
क्र टीम सामना विजय पराभव टाय नेट रन रेट पॉइंट्स
1 ऑस्ट्रेलिया 4 4 0 0 +2.223 8
2 भारत 4 2 2 0 +0.322 4
3 न्यूझीलंड 3 2 1 0 +0.282 4
4 पाकिस्तान 3 1 2 0 -0.488 2
5 श्रीलंका 4 0 4 0 -2.173 0
गट ब
क्र टीम सामना विजय पराभव टाय नेट रन रेट पॉइंट्स
1 इंग्लंड 3 3 0 0 +1.71 6 6
2 वेस्ट इंडिज 3 2 1 0 +1.708 4
३ द,आफ्रिका 4 3 1 0 +1.382 6
४ बांगलादेश 4 1 3 0 -0.844 2
5 स्कॉटलंड 4 0 4 0 -3.129 0
दोन्ही संघांनी प्रथम फलंदाजी केल्यास न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयाच्या फरकाने किमान १७ ते १८ धावांनी विजय मिळवावा लागेल. हे समीकरण गुणांवर अवलंबून असेल.
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2024 09:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

