PAK vs NZ 2nd T20I 2024 Live Streaming: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यांत आज होणार दुसरा टी-20 सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे तर न्यूझीलंडचे नेतृत्व मायकेल ब्रेसवेलकडे आहे.

PAK vs NZ (Photo Credit - X)

PAK vs NZ 2nd T20I: पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना शनिवारी रावळपिंडी येथे संध्याकाळी 8.00 वाजता खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे तर न्यूझीलंडचे नेतृत्व मायकेल ब्रेसवेलकडे आहे. दरम्यान, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिका भारतातील कोणत्याही वाहिनीवर प्रसारित होणार नाही. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिकेचे थेट प्रवाह फॅनकोड ॲपवर उपलब्ध आहे. (हे देखील वाचा: DC vs SRB, IPL 2024 35th Match Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यांत आज होणार लढत, येथे पाहू शकता लाइव्ह सामना)

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हेड-टू-हेड रेकॉर्ड

पाकिस्तान (PAK) आणि न्यूझीलंड (NZ) यांच्यात आतापर्यंत सर्वात लहान फॉरमॅटमध्ये एकूण 40 सामने खेळले गेले आहेत. एकूण 21 विजयांसह पाकिस्तान आघाडीवर आहे, तर न्यूझीलंडने 17 सामने जिंकले आहेत आणि दोन सामने निकालाशिवाय संपले आहेत.

पाहा दोन्ही संघांचे खेळाडू

न्यूझीलंड संघ: टिम सेफर्ट (विकेटकीपर), टिम रॉबिन्सन, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), जोश क्लार्कसन, जेम्स नीशम, मार्क चॅपमन, जेकब डफी, इश सोधी, बेन सियर्स, विल्यम ओ'रुर्के, जॅचरी फॉल्केस, टॉम ब्लंडेल, बेन लिस्टर , डीन फॉक्सक्रॉफ्ट, कोल मॅककॉन्ची.

पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), सैम अयुब, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, शादाब खान, इमाद वसीम, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, जमान खान, आझम खान, मोहम्मद अमीर, अबरार अहमद , अब्बास आफ्रिदी, इरफान खान, उस्मान खान.